Blind Student Earned 85 Percent Marks In The Tenth Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

जन्मापासूनचे अंधत्व त्यात रोजची अडीच किलोमीटरची पायपीट...अन् मिळविले दहावीत 85 टक्के गुण

रणजित कालेकर

आजरा : हौसले के तरकश में, कोशिश का वो तीर जिंदा रखो... हार जाओ चाहे जिन्दगी मे सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो! या ओळी आपल्या यशातून मुरूडे (ता. आजरा) येथील एका छोट्या खेड्यातील आदित्य पांडुरंग पाटील याने जिवंत केल्या आहेत. अंधत्वावर मात करीत दहावीमध्ये त्याने 85.04 टक्के गुण मिळवून लखलखीत यश संपादन केले. त्यांने मिळवलेले डोळस यश अनेकांना प्रेरणादायी असे आहे. 

अंधत्वाचा शाप जन्मापासून पाठीशी घेवून वाटचाल करणाऱ्या आदित्याचे पुढे काय होणार याची चिंता त्यांच्या घरच्यांना होती. लहानपणापासून त्याला घरच्यांनी मोठा धीर दिला. आपल्या वाट्याला आलेले अंधत्वाची दुःख मनात न बाळगता त्याने शिक्षणाची आस कायम ठेवली. शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास व्यवस्थित पुर्ण करण्यावर त्याचा भर राहिला. मुरुडे येथील मराठी शाळेत सातवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केल्यावर त्याने आठवीला आजरा हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला.

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मिळालेल्या लार्ज प्रिंट बुक साईज 36 फॉन्ट असणारे मोठे अक्षर असलेल्या पुस्तकाच्या मदतीने अभ्यास केला. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड संस्था कोल्हापूर या संस्थेने त्याला दहावीच्या अभ्यासक्रमावर ऑडीओ सीडी दिल्या. आत्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने घरी अभ्यास केला.

मुरुडे ते आजरा हे अडीच किलोमीटर अंतराची पायपीट करीत शिक्षण घेतले. दहावीसाठी दिपेश कोडक यांने त्याचा लेखनीक म्हणून काम केले. मुख्याध्यापक शिवाजी लुगडे, शिक्षक मुल्ला, समग्र शिक्षा अभियानाचे विशेष तज्ज्ञ नितीन मो, शिक्षक, आई वडील यांचे त्याला मोलाचे सहकार्य मिळाले. या यशावर तो थांबणार नाही. पुढे अधिकारी होवून समाजासाठी काम करणार असल्याचे त्यांने सांगितले. 

23 दिव्यांगाचे प्रेरणादायी यश 
आजरा तालुकयातील 23 दिव्यांग विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. अनेक जण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. यामधील दहा जणांनी लेखनीक न घेता परीक्षा दिली आहे. यामध्ये मतिमंद, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी, वाचा दोष, अंशत्व अंधत्व अशा विविध प्रकारे अपंगत्व असलेले या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश एक प्रकारे हौशला बुलंद करणारे आहे.

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचात निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

Talegaon Dabhade : गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

Horoscope Prediction: कठोर परिश्रमाचे फळ मिळणार अन्...; 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलणार,वाचा सविस्तर

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : जुन्नर मधील बिबट्या शिफ्ट करणार वनमंत्र्यांनी दिले परवानगी

SCROLL FOR NEXT