body of spinning mill entrepreneur was found in Panchganga 
कोल्हापूर

इचलकरंजीतील बेपत्ता यंत्रमाग उद्योजकाचा मृतदेह आढळला पंचगंगेत 

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - येथील अ‍ॅटोलूम उद्योजक अमर श्रीधर डोंगरे (वय 55, रा. वर्धमान हौसिंग सोसायटी) यांचा आज मृतदेह पंचगंगा नदीपात्रात आढळला. काल सकाळपासून ते बेपत्ता झाले होते. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिसांत झाली होती. 

दरम्यान, डोंगरे यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेबद्दल शहरात तर्क- वितर्क करण्यात येत आहेत. या घटनेमागे नेमके कोणते कारण असावे, याचा शोध पोलिस घेत आहेत. 

अमर डोंगरे हे शहरातील प्रतिथयश उद्योजक आहेत. त्यांचा तारदाळ येथील प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्कमध्ये अ‍ॅटोलूम कारखाना आहे. त्यांनी शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. काल सकाळी त्यांनी घरी नेहमीप्रमाणे घरी नाष्टा केला. त्यानंतर केस कापण्यासाठी जात असल्याचे सांगून दुचाकी घेवून घराबाहेर पडले. मात्र बराच वेळ घरी न परतल्यांने त्यांचा नातेवाईकांनी शोध सुरु केला.  

यामध्ये पंचगंगा नदीकाठी असलेल्या गणेश मंदिर परिसरात त्यांची दुचाकी आढळून आली. त्यामुळे या परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र काल रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. आज सकाळी पून्हा शोध कार्य सुरु करण्यात आले होते. त्यामध्ये गणेश मंदिराच्या मागे असलेल्या जॅकवेलजवळ त्यांचा मृतदेह आज आढळून आला. त्यामुळे नातेवाईकांसह त्यांच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT