पंकज खोत sakal
कोल्हापूर

महापुरात वाहून गेली पुस्तक मात्र जिद्द सोडली नाही, यंत्रमाग कामगाराचा मुलगा झाला CA

पंकज खोत हा खडतर परिस्थितीत सी. ए. परीक्षेत उत्तीर्ण झाला.

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी: यंत्रमाग कामगाराचा मुलगा पंकज खोत हा खडतर परिस्थितीत सी. ए. परीक्षेत उत्तीर्ण झाला. महापूर, लॉकडाउन यातून उद्‍भवलेल्या अनेक समस्यांना तोंड देत त्याने यश मिळवले.

पंकज याची घरची परीस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील सुरेश खोत हे यंत्रमागावर काम करतात. आई वैशाली खोत यांनी इंदिरा महिला सूत गिरणी येथे काम करीत मुलांना शिकवले. बहीण पल्लवी हिने एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करत पंकजला मार्गदर्शन केले. सीए होण्यासाठी परीक्षा देण्यास प्रोत्साहित केले. प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबीयांच्या दैनंदिन कामकाजात हातभार लावत पंकज कठीण परिस्थीतून सी.ए. ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.

पंकज राहण्यास गावभाग येथे आहे. जुलै २०१९ व २०२१ मध्ये आलेल्या महापुरामध्ये त्याचे शालेय साहित्य वाहून गेले. त्याचे प्रचंड नुकसान झाले. यातून त्याला सावारायला वेळ लागला. हातावरचे पोट असल्याने कुटुंबाकडे लक्ष देऊन त्याने अभ्यासाची जिद्द व चिकाटी सोडली नाही. अभ्यासात प्रावीण्य दाखवत कष्टाने संकटांना सामोरे जात सी. ए. परीक्षेत यश मिळवले. व्यंकटेश महाविद्यालयातून त्याने बी. कॉम.ची पदवी पूर्ण केली. सी. ए. पूर्ण झाल्यानंतर आई-वडिलांचे सर्व स्वप्न पूर्ण करणार असून सामाजिक हित जोपासत सर्वसामान्यांना मदत करीत राहणार असल्याचे सांगितले. त्याच्या यशाबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांच्याहस्ते सत्कार केला. राहुल नडाळे, विनायक कामते यांनी मराठा व्यवसाय संघातर्फे त्याचा सत्कार केला. त्याला सी. ए. नरेंद्र पुरोहित, सी. ए. श्रीमधंर व्हनवाडे , कै. सी. ए. भालचंद्र सादळे, संग्राम नरके, संदीप नरके, सागर खोत, वैभव खोत, सारिका चव्हाण, मनस्वी सादळे, देवमोरे आदींचे मागदर्शन लाभले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT