Booking of Koyna and Maharashtra Express from tomorrow 
कोल्हापूर

कोयना आणि महाराष्ट्र एक्‍सप्रेसचे बुकींग उद्यापासून 

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - कोयना आणि महाराष्ट्र एक्‍सप्रेस रेल्वे गाड्यांचे बुकींग उद्या (ता.9) पासून सुरू झाले आहे. 11 ऑक्‍टोबर पासून महाराष्ट्र एक्‍सप्रेस तर कोयना एक्‍सप्रेस 13 ऑक्‍टोबर पासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे केवळ बुकींग असलेल्या प्रवाशांनाच यामधून प्रवेश करता येणार आहे. 

सनासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये कोल्हापुरातून दोन गाड्या सुटणार आहेत. कोयना एक्‍सप्रेस ही मुंबई-कोल्हापूर 13 ऑक्‍टोबर पासून पुढील सूचना मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सुटेल आणि त्याच दिवशी कोल्हापूरला पोहोचेल. तसेच 12 ऑक्‍टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत कोल्हापूर येथून दररोज सुटेल आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. 

श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते गोंदिया विशेष गाडी 11 ऑक्‍टोबर पासून पुढील सूचना मिळेपर्यंत श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरहून दररोज सुटेल आणि दुसऱ्या दिवशी गोंदियाला पोहोचेल. तसेच हीच गाडी 13 ऑक्‍टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत गोंदिया येथून दररोज सुटेल आणि दुसऱ्या दिवशी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला पोहोचेल. 

गाड्यांचे आरक्षण उद्या (ता.9) सकाळी नऊ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर बुकींग सुरू होणार आहे. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: ३ दिवस धो-धो कोसळणार! पावसाबद्दल मोठी अपडेट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Xi Jinping India Visit: शी जिनपिंग यांचा भारत दौरा निश्चित! पंतप्रधान मोदी यांचं निमंत्रण स्वीकारलं, सात वर्षांनंतर देशात येणार

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Sillod News : पोळ्याच्या दिवशी काळाचा घाला; भराडीच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT