the border ban order will delay the marriages in the state 
कोल्हापूर

सांगा आम्ही आमच्या मुलांच लग्न कधी अन् कसं लावायचं...?

डी. आर पाटील

शिरोळ (कोल्हापूर) -  कोरोना च्या पार्श्वभूमीवर, शासनाने जिल्हा सीमा बंदीचे आदेश कायम ठेवल्याने राज्यातील युवक-युवतींचे विवाह रखडणार आहेत. मे व जून महिन्यात केवळ 14 विवाह मुहूर्त असल्याने, पालकांच्या मध्ये चिंता वाढली आहे. विवाह समारंभा करिता शासनाने जिल्हा सीमा बंदीची अट, शिथिल करावी अशी मागणी पालकांनी जिल्हा व राज्याचे प्रधान सचिव प्रशासनाकडे केली आहे. जिल्हा बंदीचे शितील न केल्यास अनेक युवक-युवतींचे विवाहाचे स्वप्न, स्वप्नच राहणार आहे.

विवाह समारंभ बाबत धोरण जाहीर नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डॉन जाहिर झाल्यापासून,सण समारंभ विवाह समारंभ, यावरती प्रतिबंध घालण्यात आले आहेत. हिंदू धर्मामध्ये विवाहाचे मुहूर्त प्रामुख्याने मार्च ते जून महिन्यात अधिक आहेत. तथापि मार्च महिन्यातच कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर केल्याने विवाह समारंभ वर प्रतिबंध आले आहेत. काही युवक-युवतींचे विवाहाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर काही युवक-युवतींचे एकमेकांचे पसंतीचे काम सुरू होते. अशातच लॉक डाउन जाहीर झाल्याने विवाह समारंभ रोखले आहेत.तसेच युवक-युवतींचे एकमेकांचे पसंतीचे काम ही रेंगाळले आहे. शासनाने चार मे पासून कोरोना च्या पार्श्‍वभूमीवर उद्योग  व व्यापारा सुरू करण्याबाबत धोरण जाहीर केले आहे.तथापि विवाह समारंभ बाबत कोणतेही धोरण जाहीर केले नाही अथवा परवानगीबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही.यामुळे इच्छुक वर वधू त्यांचे पालक हे संभ्रमात पडले आहेत.

जिल्हा सीमा बंदीचे आदेश असलेने, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाण्यास प्रतिबंध असल्याने, विवाह समारंभ कसा पार पाडायचा, या विवंचनेत युवक-युवतींचे पालक आहेत मे महिन्यात 6, 8, 12 ,14, 17 ,18 ,19 ,24 तसेच जून महिन्यात 11 ,14 ,15 ,25, 29, 30 असे केवळ 14 चा मुहूर्त असल्याने, विवाह समारंभ पार पाडण्याकरता शासनाने भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. अनेक पालकांनी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे हेलपाटे मारून विवाहास परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. तथापि याबाबत शासनाने कोणतीही आदेश दिले नसल्याचे, या कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे युवक युवती तसेच पालक नैराश्याच्या गर्तेत आहेत. काही पालकांनी राज्याचे प्रधान सचिव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे राज्यातील युवक युवतींच्या विवाह समारंभात करता, तात्काळ परवानगी द्यावी तसेच या विवाह समारंभात किमान पन्नास व्यक्तींना उपस्थित राहण्याकरता परवानगी द्यावी. अशी मागणीही केली आहे.


राज्यातील युवक-युवतींचे विवाह दोन महिन्याच्या कालावधीत होण्याकरिता आपण विशेष प्रयत्न करणार. तसेच विवाह समारंभात करता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सीमा बंदीबाबत चे आदेशामध्ये सवलत देण्याकरता आपण सूचना देऊ.

राजेंद्र पाटील-यड्रावकर - आरोग्य राज्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

IAS Officer Tukaram Mundhe : "मी आयएएसमधून निवृत्त होईन, पण सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्त होणार नाही,"; तुकाराम मुंढेंच्या विधानाने नव्या चर्चांना उधाण

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT