Border Coordination Minister Eknath Shinde information decision a cabinet meeting 
कोल्हापूर

एक नोव्हेंबरला महाराष्ट्राचे सर्व मंत्री दंडाला काळी फीत बांधून करणार काम

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बेळगावसह सीमाभागात पाळल्या जाणाऱ्या काळ्यादिनाला पाठिंबा म्हणून एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व मंत्री दंडाला काळी फीत बांधून कामकाज पाहणार आहेत. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सीमा समन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून महाराष्ट्रातही निषेध नोंदवावा, अशी विनंती केली होती.


राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची सीमा समन्वयमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आली. मंत्री शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीमाभागातील मराठी भाषकांना पाठिंबा देण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. सीमा समन्वय मंत्री भुजबळ यांनी अनुमोदन दिले. मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला. एक नोव्हेंबर रोजीच्या मराठी भाषकांच्या आंदोलनाला काळी फीत बांधून 

पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठी भाषिकांचा लढा यशस्वी होत नाही, तोपर्यंत त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


सीमाबांधव एक नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळतात. एक नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्य स्थापन झाले. गेली ६५ वर्षे तेथील ८६५ मराठी बहुल गावातील मराठी भाषक महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहे; पण, कर्नाटक सरकार सातत्याने त्यांच्यावर अन्याय करते, दडपशाही करते. मराठी भाषकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठी भाषकांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंत्री शिंदेंनी स्पष्ट केले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT