कोल्हापूर

बोरपाडळे घाटात पेटली कार: होरपळून एकाचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

बोरपाडळे (कोल्हापूर) : बोरपाडळे हॉटेलजवळील घाटात दुपारी साडेचारच्या सुमारास चारचाकी अचानक पेटल्याने गाडीमध्येच एकाचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

याबाबत घटनास्थळ व कोडोली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी कि,

अभिजित पांडुरंग ठाणेकर [ वय ३५ ] रा. पिंपळगाव-झुलपेवाडी, ता.आजरा हे आपल्या गावाकडून नावली येथील चालवण्यास घेतलेल्या त्यांच्या धाब्याकडे निघाले होते.कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील बोरपाडळे घाटात आले असताना त्यांच्या चारचाकी क्रमांक एम.एच.१४ बी.सी. ४२३० गाडीने अचानक पेट घेतला.त्यामध्ये त्यांचा जागीच गाडीत होरपळून मृत्यू झाला. उपस्थित प्रवाशी अन वाहनधारकांतून हळहळ व्यक्त होत होती.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,वडील,भाऊ असा परिवार आहे.

गाडी पेटल्यानंतर गाडी रस्त्याच्या बाजूला पेटत असल्याचे दिसत होते.सुमारे तासभर दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा उभ्या दिसत होत्या. परिसरातील बघ्यांची खूप गर्दी झाली होती. कोल्हापूरच्या अग्निशामक दलाने आग विझवण्याचे प्रयत्न केले. घटनास्थळी कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद,नरेंद्र पाटील,बी.डी.माने,हिम्मत कुंभार आदींनी भेट देऊन माहिती घेऊन पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: फायर फायटर डे का साजरा केला जातो? जाणून घ्या सोप्या शब्दात महत्त्व

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

SCROLL FOR NEXT