Both The Corona Report Of Halewadi In Ajara Taluka Are Positive Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आजरा तालुक्‍यातील हालेवाडीचे दोघे कोरोना पॉझिटिव्ह 

अशोक तोरस्कर

उत्तूर : आजरा तालुक्‍यातील हालेवाडी येथे मुंबईहून पतीच्या अस्ती घेवून आलेली एक महिला तिचा एक मुलगा या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उत्तूर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती मिळताच प्रशासनाची तारांबळ उडाली. 

या बाबत घटनास्थळावरून व सरपंच संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील 56 वर्षीय व्यक्ती कुटूंबासह मुंबई येथे राहतात. एअर फोर्समधून निवृत झाल्यावर ते बॅंक ऑफ बडोदामध्ये नोकरीस होते. त्यांना उच्च रक्तदाबा होता. त्यांचे तीन दिवसापुर्वी मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले, मात्र त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा अस्ती विसर्जनाचा कार्यक्रम गावी हालेवाडी येथे करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. याला ग्रामस्थांनी विरोध केला, मात्र विरोध डावलून ते रविवारी सकाळी दोन चार चाकी गाडीतून सहाजण अकरा वाजता गावी आले. गावी आल्यावर मयताचा मोठा भाऊ, त्याची पत्नी, व गावातील एक बहीण, अशा नऊ जणांनी मिळून अस्ती विसर्जनचा विधी पार पाडला.

हा विधी तासभर सुरू होता. यानंतर मुंबईहून आलेल्या सहा जणांना आजरा येथे स्वॅब घेण्यासाठी आलेल्या वाहनातून पाठवले. स्वॅब घेतल्यावर चालक मुंबईच्या दिशेने रवाना झाले, तर सहाजणांना आजऱ्यात क्वारंटाईन करण्यात आले. या सहा पैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यामुळे गावासह परिसरात खळबळ माजली गावच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून गावात आरोग्य, महसूल, पोलिस पथक दाखल झाले आहे. प्रशासनाकडून सहा जणांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Pune Heavy Rain: सहा तालुक्यांत अतिवृष्टी; १७ धरणांतून पाणी सोडले, दौंडमध्ये ढगफुटी

Ujani Dam:'भीमा नदीला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पूर'; उजनीतून पाच वर्षांनंतर यंदा सोडले १५२ टीएमसी पाणी, ९० हजार क्युसेकचा विसर्ग

SCROLL FOR NEXT