Both involved in verification of fake sports certificates 
कोल्हापूर

बनावट क्रीडा प्रमाणपत्र पडातळणीच्या कामात अडकले दोघे 

राजेश मोरे

कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या मुलाखतीवेळी बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांवर अटकेची कारवाई केली. संशयित अनिल चोरमले व प्रशांत पोवार या दोघांकडे संबधि प्रमाणपत्राची पडताळणीची जबाबदारी होती. त्यातच ते दोघे या प्रकरणात अडकल्याचे पोलिसांनी सांगितले. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, संशयित विजय बोरकर (रा. सांगली) याने 2016 मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठी क्रीडा स्पर्धेत सहभागी नसतानाही त्यात सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. यात त्याला संशयित महेंद्र चेंबूरकर (रा. मुंबई) व दीपक सावंत (रा. मिरज) या दोघांनी मदत केली होती. पडताळणीत हे प्रमाणपत्र अवैध असल्याचे पुढे आले. याबाबत क्रीडा अधिकारी शंकर भास्करे यांनी जुना राजवाडा पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार संशयित बोरकर, चेंबुरकर, दीपक सावंत या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


दरम्यान, तपासात क्रीडा विभागात काम करणारे संशयित अनिल चोरमले (धनकवडी, पुणे), प्रशांत पवार या दोघांकडे हे प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे काम होते. त्या दोघांनी हे प्रमाणपत्र खरे असल्याचा दाखला दिला होता. अशी माहिती पुढे आली. त्यानुसार सोमवारी त्या दोघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान त्या दोघांचा जामीनही मंजूर झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Close : आज शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला तर निफ्टी २५८ अंकांनी वर, कोणते शेअर्स फायद्यात? पाहा

अरे तो वाघ आहे...! विदर्भात लोकांचा मुर्खपणा, मोबाईल कॅमेरा घेऊन जंगलच्या राजाचा पाठलाग, VIDEO VIRAL

Mpsc Success Story: बेस्ट वाहकाचा मुलगा बनला पाेलिस उपनिरीक्षक, सूरज गोळेची प्रतिकूल परिस्थितीवर करत यशाला गवसणी; आई राबतेय शेतात!

Latest Marathi Update : कांदिवलीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठी गर्दी

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात मुक्त शिक्षण व्यवस्था राबवणार, शिक्षण विभागाचा नवा प्लॅन, नेमकी योजना काय?

SCROLL FOR NEXT