कोल्हापूर

शाहूवाडीतील रूग्णांना सीमा बंदिचा फटका

दिग्विजय कुंभार

आंबा ः कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून दोन महिन्यांपासून जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. याचा फटका विविध आजारांच्या रुग्णांना बसला आहे. त्यांना नियमित तपासणी, औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्‍टरांकडे जाता न आल्यामुळे हे रुग्ण यातना सोसत आहेत. 

शित्तूर वारुण, उखळू, सोंडोली, विरळे, कांडवण, कोतोली या उत्तरेकडील भागातील पंचवीस गावांतील रुग्णांची ही स्थिती आहे. तालुक्‍याच्या नेर्ले- कोकरुड, सोंडोली-चरण व शित्तूर-आरळा, रेठरे, गोंडोली व उखळू-मणदूर या सांगली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सीमा दोन महिन्यांपासून सील आहेत. या ठिकाणी पोलिसांचा सक्त पहारा आहे. आपली अडचण कोणाला सांगायची, या विवंचनेत येथील लोक दिवस ढकलत आहेत. 
या भागातील लोक तालुक्‍यातील मलकापूर, बांबवडे किंवा कोल्हापूर ऐवजी दैनंदिन व्यवहारासाठी कोकरूड, चरण, आरळा येथील बाजारपेठेवर व दवाखान्यासाठी कराड, बत्तीस शिराळा येथे धाव घेतात. शित्तूर वारुण येथील आरोग्य केंद्र, मोजकेच दवाखाने व तीन - चार मेडिकलची दुकाने इतकीच सुविधा या भागात आहे. 

मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब, कान, नाक, घसा, हृदयरोग यासह अन्य आजार असलेल्या रुग्णांना नियमित तपासणी, औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेण्यात मर्यादा पडत आहेत. लोकप्रतिनिधींनी किमान सवलत देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी येथील रुग्णांकडून होत आहे. 


शाहूवाडी तालुक्‍यातील लोकांचा सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांशी संपर्क येत असल्याने रुग्णांच्या समस्या योग्य आहेत. प्रशासनाच्या सहकार्याने योग्य उपाययोजनांसाठी प्रयत्नशील राहू. 
- हंबीरराव पाटील -भेडसगावकर, आरोग्य सभापती, जिल्हा परिषद कोल्हापूर. 


तालुक्‍यातील लोकांचा संपर्क बहुतांशपणे शेजारील जिल्ह्याशी येतो ही वस्तुस्थिती आहे. रुग्णांना एका दिवसात फॅमिली डॉक्‍टरकडे जाऊन नियमित तपासणी व औषधोपचार घेण्याबाबत काय करता येईल, यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन निर्णय घेऊ. 
- भालचंद्र देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक, शाहूवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT