boy suicide in covid center in kolhapur gadhinglaj 
कोल्हापूर

कोल्हापूर - सकाळी अहवाल निगेटिव्ह आला अन् दुपारी कोविड सेंटरमध्येच संपविले जीवन 

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : येथील शेंद्री रोडवरील खासगी हॉस्पीटलमध्ये सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्या एका तरूणाने आज बाथरूममध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सुधीर दत्तात्रय येसरे (रा. लिंगनूर कसबा नूल, ता. गडहिंग्लज) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. विशेष म्हणजे या तरूणाचा आज सकाळीच कोरोना अहवाल निगेटीव्ह आला होता. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास ही घटना उघडकीला आली.

शेंद्री रोडवरील त्या खासगी हॉस्पीटलमध्ये दोन दिवसापासूनच नव्याने कोविड सेंटर सुरू केले आहे. शेंद्री माळावरील सरकारी कोविड सेंटरमधील काही जणांना या नव्या सेंटरमध्ये क्वारंटाईन केले आहे. त्यातच या तरूणाचा समावेश होता. दुपारी तो बाथरूममध्ये गेला. तो लवकर बाहेर येत नसल्याने सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी त्याला हाक दिली. परंतु, आतून प्रतिसाद येत नव्हता. अखेर दरवाजा जोराने उघडल्यानंतर तो गळफास लावून घेतल्याच्या अवस्थेत आढळला.


 स्वत:च्याच पॅंट व बनियनद्वारे त्याने बाथरूममधील हुकाला गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती तत्काळ आरोग्य विभागाला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी सकाळीच त्याचा कोरोना अहवाल निगेटीव्ह येवूनसुद्धा त्याने नेमक्‍या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याबाबत तालुक्‍यात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
 
संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रवाशाने VIDEO केला म्हणून वाचला TTE, तिकीट मागताच तरुणीने स्वत:चे कपडे फाडले; धावत्या ट्रेनमध्ये घातला गोंधळ

‘आधी स्वतःकडे पाहा!’ कतरिनाच्या वाढलेल्या वजनाच्या ट्रोलिंगवर अली जाफरचा संतापला, म्हणाला...

IND W vs BAN W: भारताने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; बांगलादेशविरुद्ध सेमीफायनलसाठी अशी आहे टीम इंडियाची Playing XI

Sardesai Wada in Kasba : छत्रपती संभाजी महाराजांचे महाराष्ट्रातील अखेरचे वास्तव्य असलेला ऐतिहासिक वाडा पडझडीच्या मार्गावर; मुख्यमंत्र्यांकडे संवर्धनासाठी आर्त हाक

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा नवा फॉर्म्युला! 25 नाही तर तब्बल 'इतक्या' जागांसाठी होणार चुरस, काय आहे गणित?

SCROLL FOR NEXT