boy was infected with corona in Sankeshwar village in Belgaum district 
कोल्हापूर

बेळगाव जिल्ह्यातील संकेश्‍वर गावात 12 वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आज (ता.29) आढळला. हुक्केरी तालुक्‍यातील संकेश्‍वर गावात 12 वर्षाच्या मुलाला लागण झाली आहे. यामुळे बाधित रुग्णांची संख्या 55 झाली आहे. रायबाग तालुका कुडचीत गेल्या आठवड्यात दोन मुलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आज आणखी एका मुलाला लागण झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 मुलांत कोरोना संसर्ग झाल्याची नोंद आहे. दरम्यान, राज्यात 24 तासांत चौघा बालकांना कोरोना  लागण झाल्याचे निदान झाले आहेत.

आरोग्य विभागाने आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशिल जाहीर केला आहे. नव्या 9 रुग्णांची भर पडली. यामुळे राज्यात बाधित रुग्णांची संख्या 532 झाली आहे. हुक्केरी तालुका संकेश्‍वरात 12 वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. एप्रिल दुसऱ्या आठवड्यात संकेश्‍वर येथील एकाला संसर्ग झाला होता. त्यांच्या संपर्कात बेळगाव आझाद गल्ली येथील त्यांची मुलगी संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यानंतर आज संकेश्‍वर येथील बालकाला कोरोनाची लागण झाल्याने निदान झाले.   

बाधित 55 पैकी सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यापैकी एका वृध्देचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोना कक्षात 47 जण उपचार घेत आहेत. तसेच राज्यात नवीन 4 बालकांना कोरोना लागण झाली आहे. त्यापैकी एक संकेश्‍वरातील बालक आहे. तिन्ही मुले गुलबर्ग्यातील असून, तिघे मुली आहेत. त्यांचे अनुक्रमणे वय 4.6, 14 आणि 12 आहे. तसेच गुलबर्गा येथील 17, 20 वर्षाच्या तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. लगान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

एक नजर...

  • एकूण बाधित - 55
  • डिस्चार्ज - 7
  • अल्पवयीन बाधित - 3 (कुडची 2, संकेश्‍वर 1)
  • मृत्यू - 1
  • उपचार - 47

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT