Boys reached Kolhapur, blessed ... 
कोल्हापूर

पोरं कोल्हापुरात पोचवली, धन्य झालो... 

शिवाजी यादव

कोल्हापूर : "कोटा (राजस्थान) येथे कोरोनामुळे अडकलेल्या मुलांना कोल्हापुरात पाठवण्याचा निरोप एसटी मुख्यालयातून आला. त्यांना घरी पोहचवणे ही जबाबदारी आहेच, असे म्हणत आम्ही एसटी कोट्यातून बस काढल्या. त्यासाठी सलग 33 तास प्रवास केला. तीन राज्ये, 17 जिल्हे ओलांडत शेवटचा जिल्हा असलेल्या कोल्हापुरात मुलांना सुखरूप पोहचवले.

त्या मुलांची घालमेल, त्यांचे कोमेजलेले चेहरे कोल्हापुरात पोचताच समाधानाने फुलून गेले. त्या 40 मुलांच्या पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. एसटीच्या 25 वर्षांच्या सेवेतील हेच मोठे प्रशस्तीपत्रक आम्हाला लाभले. याचा आनंद घेऊन आम्ही धुळ्याला मार्गस्थ होत आहोत..'' एसटीच्या चार चालकांनी "सकाळ'शी बोलताना या भावना व्यक्त केल्या. 

राज्य शासनाच्या सूचनेने एसटी महामंडळाचे धुळे विभाग नियंत्रक एस. बी. संकपाळ व एसटी अधिकाऱ्यांनी मार्ग, वेळ, इंधन या पूरक बाबींचे नियोजन केले. त्यातून धुळ्याच्या एसटी गाड्या कोट्यात गेल्या. एसटीची लालपरी बघून घालमेल अनुभवणारी मुले गाडीत बसली. एवढ्या लांबचा प्रवास कसा होणार, या चिंतेतच राजस्थानातून गुजरातमार्गे प्रवास सुरू झाला.

बहुतेक सर्व मुले खिन्न मनाने बसून होती. कधी एकदा गाव येते, याची हुरहुर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ठळक होती. अशात दोन एसटी गाड्या धुळ्यात पोचल्या. इंधन भरले, पुन्हा प्रवास सुरू झाला. प्रत्येक जिल्ह्याच्या नाक्‍यावर पोलिस अडवत होते. वैद्यकीय यंत्रणा प्रकृतीची चौकशी करीत शासन आदेश पाहून पुढे सोडत होती. 

सलग दोन दिवसांच्या प्रवासानंतर शनिवारी सकाळी सात वाजता गाड्या कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात पोहचल्या. मुलांचे पालक येथे आले होते. मुले पटापट गाडीतून उतरली. आई-वडिलांच्या गळ्यात पडण्याची भावना सोशल डिस्टन्सिंगमुळे गळून पडली; पण डोळ्यांनी एकमेकांना भरभरून पाहता आले. "आपलं लेकरू आपल्याजवळ आलं..' असा भाव घेऊन पालकांचे तसेच मुलांचेही डोळे पाण्याने डबडबले. सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी रांग लागली. 

जिगरबाज चालक... 
विलास काकडे (वय 56), कैलास शिंदे (वय 50), हेमंत पाटील (वय 41), अमोल पाटील (वय 36, सर्व राहणार धुळे). 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

Palghar Bribery case: पालघरमध्ये आरोग्य अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, 35 हजार स्विकारत हाेते अन् काय घडलं!

Dharshiv Hailstorm News: लातूर-धाराशिवमध्ये गारपीटीचा कहर; शेती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; अवकाळी पावसाचा तडाखा!

Malkapur Accident: कंटेनरखाली चिरडल्याने दुचाकीस्वार ठार; मलकापूरजवळ अपघात, कंटेनरच्या वेगानं हाेत्याचं नव्हतं झालं!

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

SCROLL FOR NEXT