bribed for one employee of income tax office find in presentation department today rupees 10 lakh in kolhapur 
कोल्हापूर

ब्रेकिंग ; दहा लाखाची लाच घेताना प्राप्तिकर विभागाचा अधिकारी जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  एका डॉक्टरकडून छापा न टाकण्यासाठी तब्बल दहा लाखाची लाच घेताना प्राप्तिकर विभागाचा निरीक्षक आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. 
प्रताप महादेव चव्हाण (वय ३४ रा. राजारामपुरी)  असे या निरीक्षकाचे नाव आहे. आज दुपारी लक्ष्मीपुरी परिसरातील विल्सन पुलावर चव्हाणला दहा लाख रुपये घेताना पकडले.

शहरातील डॉक्टर विरोधात अज्ञात व्यक्तीने प्राप्तिकर विभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाच्या अनुषंगाने प्राप्तीकर विभागाकडून संबंधित डॉक्टरांची चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान घरावर छापा टाकण्याचा इशारा निरीक्षक चव्हाण यांनी दिला होता. हा छापा टाळण्यासाठी डॉक्टरने चव्हाण यांना विनंती केल्यानंतर यासाठी सुरुवातीला चव्हाण यांनी 25 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. शेवटी हा व्यवहार 14 लाख रुपये असा ठरला. 

काल मध्यरात्रीपासून ही तडजोड सुरू होती. त्याच दरम्यान संबंधित डॉक्टरांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधून तक्रार दिली. ठरलेल्या रकमेपैकी दहा लाख रुपये आज देण्याचे ठरले होते. ही रक्कम घेताना चव्हाण याला लाचलुचपत विभागाने अटक केली. कारवाईच्या भीतीने इतरांच्या पोटात गोळा आणणाऱ्या प्राप्तिकर विभागातील निरीक्षकाला लाच घेताना कारताना पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT