कोल्हापूर

गारवा देणारी चंदगड फाटा मार्गावरील ब्रिटिशकालीन आंब्याची झाडे तोडली

सुनील कोंडुसकर

चंदगड : चंदगड फाटा ते चंदगड या तीन किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा आंब्याची झाडांची कत्तल पाहून पर्यावरण प्रेमी आणि संवेदनशील माणसाच्या डोळ्यात अश्रू उभे रहात आहेत. कडक उन्हाळ्यात या डेरेदार वृक्षांच्या थंडगार छायेतील प्रवास एक वेगळीच अनुभूती द्यायचा. कोणीही सहजपणे प्रेमात पडावे असा हा परिसर आता उजाड झाला आहे. या झाडांचे अस्तित्व अबाधित राखून रुंदीकरण करता आले नसते का? असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

गेल्या काही वर्षात तालुक्‍याच्या पर्यावरणावर राजरोसपणे हल्ला होत आहे. गारगोटी-गडहिंग्लज- कोदाळी या रस्त्याच्या शेवटच्या टप्प्यातील मलगेवाडी फाटा ते चंदगडमार्गे कोदाळी रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी सर्वात आधी झाडांवर कुऱ्हाड पडली. सुरवातीला चंदगड ते हेरे पर्यंतची झाडे तोडण्यात आली. दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल करण्यात आली. आंबा, फणस, जांभूळ यासारखी देशी झाडे तयार होण्यास मोठा कालावधी लागतो.

ही झाडे हेच या विभागाचे वैभव आहे. पर्यटक हे सौंदर्य पाहण्यासाठीच येतात. परंतु रस्ते उजाड केल्यामुळे सौंदर्य हरपले आहे. चंदगड फाटा मार्गावरील आंब्याची झाडे सुमारे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वी ब्रिटिश काळात लावली होती. सध्या तोडलेले बुंधे पाहता ती अजूनही शंभर वर्षे टीकली असती.

परकियांनी जाणीवपूर्वक देशी झाडे लावून या परीसराच्या सौंदर्यात भर घातली परंतु स्वकियांना ते राखता आले नाही अशाच प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. या मार्गावरील वाहनांचे प्रमाण विचारात घेता एवढ्या मोठ्या रस्त्याची गरज होती का? असाही प्रश्‍न विचारला जात आहे. झाडे अबाधित राखून रस्ते करण्याचे तंत्रज्ञान जगभरात वापरले जात आहे. यापुढील काळात तरी याबाबत संबंधित खात्यांनी संवेदनशीलता पाळावी, अशी मागणी होत आहे. 

पर्यावरणप्रेमी चळवळ... 
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या तालुक्‍यात एव्हीएच कंपनीच्या विरोधातील लढा हा पर्यावरण रक्षणाच्या मुख्य मुद्याभोवती लढला गेला. परंतु दरवर्षी लाखो झाडांवर कुऱ्हाड चालवली जात असताना त्याकडे दुर्लक्ष आहे. यासाठी संवेदनशील नागरिकांनी एकत्र येऊन पर्यावरण चळवळ राबवायला हवी. राजकारणाच्या पलीकडे जाऊन तालुक्‍याचे हित जोपासायला हवे.

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT