Electric Shock in Koparde Village esakal
कोल्हापूर

शेतात खत घालायला गेलेल्या सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत; पाटील कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

कष्टाळू व कर्त्या भावांचा असा अचानक मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ डिजिटल टीम

विजेच्या धक्‍क्याने सुहास धडपडत खाली कोसळला. भाऊ कोसळल्याचे पाहून स्वप्नीलने त्याला पकडले. त्यामुळे त्यालाही विजेचा धक्का बसला.

शाहूवाडी : भात पिकाची (Rice Crop) रोप लावण केलेल्या शेतात तणनाशक व खत घालण्यास गेलेल्या सुहास कृष्णा पाटील (वय ३६) व त्याचा सख्खा लहान भाऊ स्वप्नील (३१, दोघे रा. कोपार्डे, ता. शाहूवाडी) यांचा वीज तारेचा धक्का (Electric Shock) बसून जागीच मृत्यू झाला. काल दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली. कष्टाळू व कर्त्या भावांचा असा अचानक मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सुहास व स्वप्नील शेती करत होते. शेतीला जोडधंदा म्हणून दोघे गावाशेजारील येळाणे हद्दीतील चनवाड फाटा येथे गाड्या धुण्यासाठीचे सर्व्हिंसिंग सेंटरही चालवत होते. दोघेही काल दुपारी दोनच्या सुमारास जेवण झाल्यानंतर भात लावण केलेल्या शेतात तणनाशक व खत घालण्यासाठी वडिलांबरोबर गेले. दोघे तणनाशक व खत घालत होते. त्यावेळी वडिलांनी जनावरांना वैरण काढली.

त्यानंतर ते भारा घेऊन घरी आले. पाठीमागे दोघे भाऊ भात शेतात काम करत होते. त्यावेळी नदीकडील बाजूस शेतपंपासाठी असणाऱ्या वीज खांबाच्या आधारासाठी लावलेल्या तारेमधून वाहत असलेल्या वीज प्रवाहाचा धक्का मोठा भाऊ सुहास याला बसला. या धक्‍क्याने सुहास धडपडत खाली कोसळला. भाऊ कोसळल्याचे पाहून स्वप्नीलने त्याला पकडले. त्यामुळे त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यात दोघांचाही जागीच होरपळून मृत्यू झाला.

बराच वेळ झाला तरी दोन्ही मुले घरी का आली नाहीत म्हणून त्यांना बोलावण्यासाठी वडील कृष्णा पुन्हा शेतात गेले. त्यावेळी वीज खांबाशेजारी दोन्ही मुलगे निपचित पडल्याचे दिसले. वीज तारेच्‍या धक्‍क्‍याने दोघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज बांधून ते माघारी फिरले. आरडाओरडा करतच ते गावात आले आणि गावकऱ्यांना झाला प्रकार सांगितला.

तेव्हा ग्रामस्थांनी महावितरणला कळविले व घटनास्थळाकडे धाव घेतली. मनमिळावू व कष्टाळू सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. सुहास व स्वप्नील दोघेही विवाहित आहेत. सुहास याला एक मुलगी आहे. घटनास्थळी महावितरणचे अधिकारी व पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

माणसं का आली आहेत?

कृष्णा पाटील सुहासची मुलगी व मुलाला घेऊन घराच्या दरवाजाशेजारी बसले होते. त्यावेळी ती लहान मुले त्यांना माणसं का आली आहेत. मामा, पप्पा कुठायेत असे विचारत होती. त्यांचे ते बोबडे बोल ऐकूण आजोबांसह उपस्थितांचे डोळे पाणवत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT