Kolhapur Police Nipani Crime News esakal
कोल्हापूर

निपाणीतील सख्ख्या भावांना कोल्हापुरातील चोरीप्रकरणी अटक; तब्बल 12 गुन्हे उघडकीस, 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वाहने आणि चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढले होते.

सकाळ डिजिटल टीम

चिक्कोडीच्या उपअधीक्षकांकडून परवानगी घेऊन दोघांनाही अटक केली.

कोल्हापूर : खुनाच्या गुन्ह्यातील हद्दपार दोघा सख्ख्या भावांना कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) चोरीप्रकरणी अटक केली. अशरफअली शेरअली नगारजी (वय १९) आणि सैफअली शेरअली नगारजी (२३, दोघे. रा. दर्गागल्ली, निपाणी) अशी त्यांची नावे आहेत.

या दोघांच्या चौकशीतून दुचाकी चोरी आणि चेन स्नॅचिंगचे १२ गुन्हे उघडकीस आले व ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती उपअधीक्षक अजित टिके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शाहूपुरी पोलिस (Shahupuri Police) ठाण्यातील पथकाने कारवाई केली.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वाहने आणि चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी विशेष तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार शाहूपुरीच्या पथकाने सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीद्वारे तपास केला, तेव्हा काही चोरटे कदमवाडी परिसरात भाडेतत्त्वावरील घरात रहातात.

हे दोघे शहरासह जिल्ह्यात दुचाकी आणि चेनस्नॅचिंग करायचे आणि पुन्हा कर्नाटकात जाऊन रहायचे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार शोध घेतला तेव्हा ते निपाणीतून हद्दपार असल्याची माहिती पुढे आली. या दोघांचा पोलिसांनी तेथील पोलिस ठाण्याकडून ताबा घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी चिक्कोडीच्या उपअधीक्षकांकडून परवानगी घेऊन दोघांनाही अटक केली.

त्यांच्या चौकशीत जिल्ह्यातील बारा ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिल्यावर मुद्देमालही जप्त करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, सहायक फौजदार संदीप जाधव, हवालदार संजय जाधव, मिलिंद बांगर, लखनसिंह पाटील, शुभम संकपाळ, बाबासाहेब ढाकणे, रवी आंबेरक, विकास चौगुले, महेश पाटील, वीरेंद्र वडेर यांनी ही कारवाई केली.

मोटारसायकली, दागिने जप्त

जप्त मुद्देमाल शाहूपुरी पोलिस ठाणे हद्दीतील चोरीला गेलेल्या तीन मोटारसायकली, एक राजारामपुरीतील मोटारसायकल, एक कर्नाटकातील मोटारसायकल असा एक लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच मंगळसूत्र व चेनस्नॅचिंग अशा जबरी चोरीत कुरुंदवाड, शिरोळ, हुपरी, कागल, शिरोली एमआयडीसी, जयसिंगपूर, कागल या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

एक अभियंता, एक बारावी नापास

भावांपैकी सैफअली अभियंता आहे. त्याचा लहान भाऊ बारावी नापास आहे. त्या दोघांनाही बेळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले असून, कर्नाटकातील कायद्यानुसार पोलिसांनी चामराजनगर जिल्ह्यातील हनूर पोलिस ठाणे येथे हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ते दोघे तेथे हजेरी लावत होते. त्यांचा ताबा घेण्यासाठी चिक्कोडी (जि. बेळगाव) येथील उपअधीक्षकांकडून परवानगी घ्यावी लागल्याची माहिती निरीक्षक सिंदकर यांनी दिली. त्यांनीच अन्य दोघा साथीदारांसह चोऱ्या केल्या आहेत. त्या दोघांचा शोध सुरू आहे. हिसडा मारून हॅण्डेल लॉक तोडून ते वाहनांची चोरी करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT