buffalo trapped in Rankala lek out by the fire brigade 
कोल्हापूर

तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांने वाट चुकलेल्या म्हशींची केली सुटका

मोहन मेस्त्री

रंकाळा (कोल्हापूर) :  मॉर्निंग वॉकसाठी नागरिक रंकाळा पदपथावर फिरायला येतात, त्याचप्रमाणे काही म्हशीही मोकळ्या हवेसाठी रंकाळ्यावर  येतात. आज सकाळी काही म्हशी आज पाण्यात वाट चुकल्या, मालकाच्या हाकेला साद न देता पाण्याबाहेर येण्याऐवजी पुढे-पुढे जात राहिल्या. एरवी दंडाच्या भीतीने महापालिकेच्या यंत्रणेच्या नजरेआड पाण्यात म्हशी नेणाऱ्या मालकांनी आज मात्र सुटकेसाठी अग्निशामक दलाला पाचारण केले आणि म्हशींना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल दोन तास प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. 

बोटींचा वापर करत म्हशींना सांडव्याकडील बाजूने बाहेर काढले. कोल्हापुरात पंचगंगा नदी आणि रंकाळा बचाव मोहीम राबवली जात आहे. पाण्यात कपडे धुणे, गणेशमूर्ती विसर्जन आणि निर्माल्य टाकण्यासही बंदी आहे; मात्र हा आदेश धाब्यावर बसवून पाण्यात जनावरे धुणे सुरूच असते. आज सकाळी राजकपूर पुतळ्यासमोरच्या बाजूला पाच म्हशी रंकाळ्यात डुंबत होत्या; पण मालकाचे दुर्लक्ष झाले आणि म्हशी बाहेर येण्याऐवजी  राजघाटाच्या दिशेने गेल्या. पुढे गेल्यावर मात्र म्हशींना बाहेर येण्याचा मार्ग समजेना. मग अग्निशामक दलाला पाचारण केले.

वारसादोन गाड्या आणि दहा जवान आले. केंदाळामुळे मोटरबोट म्हशींपर्यंत नेणे अशक्‍य झाले. नंतर वल्ह्याच्या बोटींनी म्हशींना बाहेरच्या बाजूला हाकलले.  दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर या म्हशींना सांडव्याच्या बाजूने पाण्याबाहेर काढण्यात पथकाला यश आले.  मोहिमेत अग्निशमनच्या चेतन जानवेकर, प्रणित ब्रह्मदंडे, अक्षय पाटील, संजय माने, सुरेश मर्दाने, सुनील वायदंडे यांनी सहभाग घेतला.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT