The building, built in 2006, has not been used
The building, built in 2006, has not been used  
कोल्हापूर

2006 मध्ये बांधली इमारत; 14 वर्षांत एकदाही केला नाही वापर

सदानंद पाटील

कोल्हापूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्‍याला गट साधन केंद्र बांधण्यात आले. करवीर तालुक्‍यासाठीचे केंद्र पाचगाव येथे बांधले आहे. यासाठी सहा लाख रुपये खर्च केला. मात्र, 2006 मध्ये बांधलेल्या या केंद्राचा 14 वर्षात एकदाही वापर झालेला नाही, हे विशेष. महत्वाचे म्हणजे वरिष्ठ कार्यालयानेही याबाबत विचारपूस केली नसून अधिकारी, पदाधिकारी यांनीही हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही. 

6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार देण्याची तरतूद राज्य घटनेत केली आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी केंद्र सरकार सर्व शिक्षा अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबवत आहे. मागील 15 वर्षाहून अधिक काळ हा प्रकल्प राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे. यासाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणाही निर्माण केली आहे. यामध्ये कंत्राटी कार्यकारी अभियंता, उपअभियंता, लेखाधिकारी, समन्वयक, विषय तज्ज्ञ आदींचा समावेश आहे. जिल्ह्याला ज्याप्रमाणे यंत्रणा आहे तशीच यंत्रणा तालुकास्तरावरही कार्यरत आहे. 

जिल्ह्यातील 12 ही तालुक्‍यांमध्ये गट साधन केंद्र बांधले आहे. यातील 11 तालुक्‍यातील केंद्रांचा वापर सुरू आहे. मात्र, करवीर तालुक्‍यातील गट साधन केंद्राचा वापर मात्र नाही. पंचायत समितीच्या जागेत उभारलेल्या या केंद्रामध्ये एक हॉल व तीन रुम बांधल्या आहेत. अत्यंत प्रशस्त असे हे केंद्र गेल्या 14 वर्षापासून वापराविना पडून आहे. खरं तर पंचायत समितीचा शिक्षण विभाग असेल किंवा जिल्हा परिषदेचा, या विभागांनी गट साधन केंद्राबाबत विचारणा करणे आवश्‍यक होते. करवीर पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही याकडे गांभीर्याने पाहणे आवश्‍यक होते. मात्र तसे न झाल्याने हे साधन केंद्र पडून आहे. 

आजमितीस या साधन केंद्राची दुरवस्था झाली आहे. गतवर्षी करवीर पंचायत समितीत पाणी आल्यानंतर येथील काही विभाग पंचायत समितीच्या ठिकठिकाणी असलेल्या जागेत स्थलांतरीत करण्याबाबत चर्चा झाली. प्रत्यक्षात मात्र काहीच कारवाई झालेली नाही. किमान आतातरी पंचायत समितीने गांभीयार्न विचार करुन या बंद असलेल्या इमारतीचा वापर करावा, अशी मागणी होत आहे. 

करवीर पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत पाचगाव येथे गट साधन केंद्र बांधले आहे. खरंतर या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या साधन केंद्राचा वापर करणे अपेक्षित आहे. मात्र, ही बाब कोणी निदर्शणास आणून दिली नाही. अनेक वर्षापासून हे केंद्र बंद आहे. ते सुरु करण्यासाठी निश्‍चितच प्रयत्न केले जातील. 
- अश्‍विनी धोत्रे, सभापती, करवीर पंचायत समिती. 


दृष्टिक्षेप 
- सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाचगावात उभारणी 
- सहा लाख रुपये केला होता खर्च 
- केंद्रामध्ये एक हॉल व तीन रुम बांधल्या 
- वरिष्ठ कार्यालयाकडूनही केंद्राबाबत विचारणा नाही 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT