Bus Service Disrupted In Kowad Kolhapur Marathi News
Bus Service Disrupted In Kowad Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कोवाडला बस सेवा विस्कळीत

अशोक पाटील

कोवाड : गेल्या अनेक दिवसांपासून कोवाड परिसरातील एसटीच्या बसफेऱ्या विस्कळीत झाल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला आहे. पासधारक विद्यार्थ्यांचे तर शैक्षणिक नुकसानीसह आर्थिक नुकसानही होत आहे. 18 फेब्रुवारीपासून बारावीच्या बोर्ड परीक्षेला सुरवात होणार आहे. कोवाड केंद्रावर परिसरातील पाचशे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. त्यामुळे परीक्षा काळात बस सेवा सुरळीत राहील का, असा प्रश्‍न विद्यार्थी विचारत आहेत. 

कोवाड परिसरात सतत बस फेऱ्या विस्कळीत होत असल्याने विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. गेल्या महिन्याभरापासून कोवाड परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अनुभव घेत आहेत. अचानक बस सेवा विस्कळीत होत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला आहे. आगार प्रमुखांना याबाबत कळवूनही त्याची गांभिर्याने दखल घेतली नसल्याने विद्यार्थी व पालकांच्यातून रोष व्यक्त होत आहे.

आता 18 फेब्रुवारीपासून बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू होत असल्याने बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर बस सेवा देण्याची गरज आहे. बस वेळेवर आल्या नाहीत तर आपण वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचणार नसल्याची भिती विद्यार्थ्यांत आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांच्याकडे बस सेवा सुरळीत करण्याबाबत मागणी केली आहे.

त्याअनुषंगाने कोवाड येथील बारावीच्या केंद्राचे केंद्र प्रमुख प्रा. एस. डी. सावंत यांनी आगार प्रमुखांना परीक्षा काळात बस सेवा नियमित सुरू ठेवावी, अशी लेखी मागणी केली आहे. कोवाड येथे बारावीच्या परीक्षेचे केंद्र आहे. येथे परिसरातील पाचशे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. यातील बहुतांशी विद्यार्थी बाहेरगावचे असल्याने त्यांना बसची गरज आहे. पण या भागातील बस सेवा सतत काही ना काही कारणास्तव विस्कळीत केली जाते. त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. 

बस सेवा अचानक बंद 
नियमित मार्गावर असलेल्या बसही अचानक बंद केल्या जातात. काही अन्य मार्गाने वळविल्या जातात. पण याची प्रवाशांना माहितीही नसते. शालेय विद्यार्थी मात्र बसची वाट पाहत दिवसभर ताटकळत थांबतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा काळात अशा अचानक बस रद्द केल्या, तर आपली अडचण होईल. आपल्याला परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचता येणार नाही, अशी भिती वाटते. त्यामुळे आगार प्रमुखांनी बस सेवा सुरळीत करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT