Bus took Four Hour And A Half Hours To Fill Kolhapur Marathi News  
कोल्हापूर

...अन् एक बस भरायला लागले साडेचार तास

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : साठ दिवसांच्या लॉकडाऊननंतर आजपासून एसटी सेवेला प्रारंभ झाला. येथील आगारातून आज पहिल्या दिवशी गडहिंग्लज-कोल्हापूर ही एकच एसटी धावली. त्यातसुद्धा 19 प्रवाशांचे भारमान होण्यासाठी तब्बल साडेचार तासाची प्रतीक्षा करावी लागली. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्चपासून लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक बंद केली. 30 मे पर्यंत लॉकडाउन असला तरी आजपासून एसटी सुरू करण्याची सूचना शासनाकडून करण्यात आली. त्यानुसार आज येथील एसटी आगारप्रमुख मनगुतकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याची सूचना केली. बसेसही सकाळी फलाटावर लावल्या. परंतु, एक प्रवासी चौकशीसाठीसुद्धा आला नाही. परिणामी ड्युटीवर आलेले कर्मचारी बसूनच राहिले. 

कोल्हापूर नॉनस्टॉप बस सकाळी साडेआठ वाजता फलाटावर लावण्यात आली होती. परंतु, त्याचे भारमान होण्यासाठी तब्बल साडेचार तास प्रतीक्षा करावी लागली. अखेर भारमानासाठी तीन प्रवासी कमीच पडले. अखेर साडेबारा वाजता ही बस गडहिंग्लजमधून सुटली. कापशी, गोरंबे, कागलमार्गे ही बस धावणार असल्याने त्याचे तिकीट दर 110 रुपये इतके होते. कोल्हापूरहून परतताना अवघे दोनच प्रवासी मिळाले. ही एक एसटी वगळता इतर कोणत्याही मार्गावर एसटी धावली नसल्याचे आगार प्रमुख मनगुतकर यांनी सांगितले. 

चार कोटींच्या उत्पन्नावर पाणी... 
आधीच तोट्यात असणाऱ्या एसटी महामंडळाला अधिक आर्थिक घाट्यात नेण्यात लॉकडाउनचा हातभार लागला. गडहिंग्लज आगाराला दर महिन्याला दोन ते सव्वा दोन कोटीचे उत्पन्न मिळायचे. या लॉकडाउनमुळे साठ दिवसाचे चार कोटींहून अधिक रक्कमेच्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : सावधान! पीडित महिलांचे AI व्हिडिओ व्हायरल कराल तर जेलमध्ये जाल; नाशिक एसआयटी चा इशारा

Latur News: ‘भाकरीच्या चंद्राला’आता महागाईचा डाग; ज्वारी ५५ ते ६० रुपये किलो, उत्पादन क्षेत्र घटल्याने हुरडा पार्ट्यांवरही परिणाम

Latest Marathi News Live Update : कोकणवासियांसाठी मनसे मैदानात

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Aadhaar App Preload : "ही जबरदस्ती कशासाठी?" नवीन मोबाईलमध्ये आधार ॲप सक्तीचे; पण ॲपल-सॅमसंगचा सरकारला विरोध का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT