कोल्हापूर

Video - बस गेली वाहून; नाशिकचे 11 प्रवासी सुखरूप, भुदरगडची घटना

पोलिस आणि प्रशासनाच्या अथक प्रयत्नातून तेथील ११ प्रवाशांना बाहेर काढून त्यांना सुखपूर ठिकाणी ठेवले

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : महापुराच्या (flood kolhapur) पाण्यातून प्रवाशांसह वाहून जाणाऱ्या दोन बसेसना पोलिस आणि प्रशासनाने सुखरूप बाहेर काढले. कोल्हापूर-पन्हाळा महामार्गावरून रत्नागिरीला (ratnagiri) आणि भुदरगड तालुक्यातून नाशिकला (nashik travellers) जाणाऱ्या बसेस मधील ३६ प्रवाशांचा जीव वाचवण्यात आला आहे. मध्यरात्री आणि पहाटे या घटना घडल्या आहेत. यातील भूदरगड येथील बस वाहून गेली आहे. (kolhapur rain update)

पहाटे चारच्या सुमारास भुरदगड पोलिस ठाणे हद्दीतील पांगिरे गावाजवळ असलेल्या चिकोत्रा नदीच्या पात्रात आजऱ्यावरून आलेली खासगी आराम बस चालकाने पुलावरून वाहनाऱ्या पाण्याचा अंदाज न घेता पुढे नेली. तेथे बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांकडे दुर्लेक्ष करून पुलावर बस नेण्याचा प्रयत्न करताना ती पाण्याचा दाबाने घसरून नदी पात्रात अडकली. येथे भूदरगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पोलिस आणि प्रशासनाच्या अथक प्रयत्नातून तेथील ११ प्रवाशांना बाहेर काढून त्यांना सुखपूर ठिकाणी ठेवले.

पाहता पाहता ही बस वाहून चालली असतानाच पोलिस (police) आणि प्रशासनाने यातील अकरा प्रवासी बाहेर काढले. त्यांना बस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र पाण्याचा दाब अधिक असल्यामुळे बस वाचविणे अशक्य झाले. मात्र नाशिकला निघालेले अकरा प्रवासी सुखरूप बाहेर काढले. दरम्यान मध्यरात्री तीनच्या सुमारास कोल्हापूर-पन्हाळा महामार्गावर रत्नागिरी महामार्गावर निघालेली ५४ सिटीर बस रजपूतवाडी जवळ पाण्यात अडकली होती. बसमध्ये आठ पुरूष, आठ महिला, सहा लहान मुले आणि इतर अशी एकूण २५ प्रवासी होते. गाडी पाण्यात मध्यभागी गेल्यानंतर पाण्याचा वेग आणि खोली पाहून वाहनचालक घाबरला आणि त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनास माहिती दिली. दोन जवानांनी मार्ग काढून बस पर्यंत पोचले. बोटीने त्यांना बाहेर काढण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT