Vadgaon Bhairi Temple Fair
Vadgaon Bhairi Temple Fair esakal
कोल्हापूर

Kolhapur : 'या' गावात जपली जातीये अनोखी प्रथा; 'गुपचूप' बंद ठेवले जातात व्यवहार

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियामुळे परिसरात या गुप्त जत्रेची जाहीर चर्चा होत आहे.

सेनापती कापशी : कागल तालुक्यातील वडगावमध्ये (Kagal Vadgaon) चौदा वर्षांनंतर अनोखी धार्मिक प्रथा जपली जात आहे. गुपचूप होणाऱ्या जत्रेसाठी दोन दिवस गावातील व्यवहार बंद ठेवले आहेत. गावच्या वेशी बंद करुन आत-बाहेर प्रवेश बंद ठेवले आहेत.

या गुप्त पण अनोख्या प्रथेची चर्चा सोशल मीडियातून होत आहे. गावाला बाधा होऊ नये, गावात नेहमी शांतता रहावी म्हणून सुमारे शंभर वर्षांपूर्वीची ही गुप्त देवाच्या जत्रेची प्रथा आहे. दीर्घ काळानंतर होणारी ही जत्रा जुन्या नागरिकांच्या विचाराने होते.

गेल्या पन्नास वर्षांत ती दोन वेळाच झाली. यापूर्वी ती २००८ मध्ये झाली होती. या प्रथेनुसार गावाच्या वेशी दोन दिवसांसाठी पूर्ण बंद केल्या जातात. या काळात गावातील नागरिकांना बाहेर जाण्यास अथवा बाहेरील व्यक्तीस आत येण्यास बंदी केली जाते. ग्रामदैवत भैरी मंदिरातील (Bhairi Temple) प्रवेशही भक्तांसाठी बंद केला जातो.

आज सकाळी गावची दोन्ही प्रवेशद्वारे पत्रा, फळ्या लावून बंद केली आहेत. गावातील गिरणी, दुकाने बंद ठेवून गावापुरते लॉकडाऊनच केले आहे. जुन्या लोकांच्याकडून आलेल्या या प्रथेनुसार जत्रा केली जात असताना नव्या पिढीतील युवक थोडे दूरच आहेत. गावात बाहेरील व्यक्तीला प्रवेश नसल्याने याबद्दल गुप्तताही पाळण्याचा प्रयत्न होतो. यापूर्वी त्याची फारशी चर्चा झाली नाही. मात्र आता सोशल मीडियामुळे परिसरात या गुप्त जत्रेची जाहीर चर्चा होत आहे. उद्या दुपारी जेवणानंतर वेशी खुल्या होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT