कोल्हापूर

भटक्‍या कुत्र्यांना ऍन्टी रेबीज व्हॅक्‍सीन देण्याची मोहीम

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरातील भटक्‍या कुत्र्यांपासून निर्माण होणारा रेबीजचा धोका टाळण्यासाठी त्यांनाच ऍन्टी रेबीज व्हॅक्‍सीन देण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. तसेच निर्बीजीकरणाचे कामही सुरू आहे. या दोन्ही उपक्रमांद्वारे भटक्‍या कुत्र्यांचा धोका व उच्छाद कमी होण्याची शक्‍यता आहे. शहराच्या सर्वच भागांत भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मध्यरात्री दुचाकी अथवा मोटार नजरेस पडल्यास कुत्री धावून जातात. पिसाळलेले कुत्रे चावल्यास जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागते. भविष्यात हा प्रश्‍न गंभीर होऊ नये, यासाठी रेबीज लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे, पण त्यांना पकडण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. लस देतानाही जाळीत बंदिस्त करून लस द्यावी लागते. लसीकरण ओळखण्यासाठी कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधला जातो. 

खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे गर्दी 
मटण दुकानाच्या परिसरात कुत्री दिसायची. आता मांसाहारी खाद्यपदार्थाच्या गाड्यांची संख्या वाढली. त्यांनी शिल्लक अन्न टाकले की कुत्री तिथे गर्दी करतात. एक दिवस खाण्यासाठी मिळाले नाही की ती आक्रमक होतात. 

शहरातील भटक्‍या कुत्र्यांचे शंभर टक्के रेबीज लसीकरण सुरू केले आहे. तसेच निर्बीजीकरणाचेही काम सुरू आहे. लसीकरणाद्वारे भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्याचा प्रयत्न आहे. 
- डॉ. विजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Rule Changes: लोनशी संबंधित हे 4 नियम आजपासून बदलले! CIBIL स्कोरमध्ये मोठा बदल; आता या गोष्टींसाठी चार्ज नाही

Minor Girl Incident : नाशिक जिल्हा अश्लीलतेच्या चर्तेतून बाहेर जात नाही, खरातनंतर खासगी व्हॅन चालकाने अल्पवयीन मुलीबाबत उचललं चुकीचं पाऊल

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : सांगली ZP विषय समिती निवडी बिनविरोध; महाविकास आघाडीची सरशी

SCROLL FOR NEXT