Cancel Extension of Market Committee Retirement: Order of the Director of Marketing 
कोल्हापूर

बाजारसमितीच्या सेवानिवृत्तांची मुदत वाढ रद्द करा ः पणन संचालकांचे आदेश

शिवाजी यादव

कोल्हापूर ः राज्यातील ज्या शेती उत्पन्न बाजार समित्या तसेच सहकारी संस्थांमध्ये सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुदत वाढ दिली आहे. त्यांची मुदत वाढ रद्द करावी, असे आदेश पणन संचालकांनी दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीतील सचिवांची मुदत वाढ रद्द करावी, असे लेखीपत्र जिल्हा निबंधकांनी बाजार समितीला दिले आहे. 
राज्यभरातील शेती उत्पन्न बाजार समितीत अनेक अधिकारी व कर्मचारी शासकीय नियमानुसार सेवा निवृत्त झाले.त्यांचा अनुभव व कारभारातील बारकाव्यांची सखोल माहिती असल्याने त्यांना संबधीत बाजार समित्यांच्या संचालक मंडळाने मुदत वाढ दिली व जबाबदाऱ्या कायम ठेवल्या. त्यामुळे नियमित सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्या आहेत. तसेच संबधीत कर्मचाऱ्यांचे अर्थिक नुकसानही झाले. त्यामुळे मुदत वाढीचा विषय बाजार समित्यामध्ये वादाचा विषय ठरला आहे. यातही बहुतेक बाजार समित्यात राजकीय पक्षाशी संबधीत संचालक मंडळ आहेत. राजकीय हित संबधातून मुदतवाढी दिल्याचा आरोप होत आहे. तर काही नाराज कर्मचाऱ्यांनी पणन संचालकांकडे तक्रारीही केल्या होत्या. याचा संदर्भ घेऊन पणन संचालकांनी मुदतवाढीच्या नियुक्ती रद्द करण्याबाबत आदेश काढले. शासकीय सेवा, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळात सेवा निवृत्त झालेल्यांना उच्च न्यायालयांच्या आदेशानुसार मुदतवाढ किंवा फेरनियुक्ती करण्यास र्निबंध घातले आहेत. त्यानुसार अशा मुदत वाढी रद्द करण्याचे आदेश दिले. 

जिल्हा निबंधकांनी आदेशाला स्थगिती 
येथील जिल्हा निबंधकांनी येथील बाजार समिती सचिवांची पदोन्नती रद्द करण्याबाबत यापूर्वी निर्देश दिले होते. त्याविरोधात जुन्या संचालक मंडळाने तीन महिन्या पूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. तेव्हा वरील आदेशाला स्थगिती मिळाली होती. या संदर्भातील पुढील सुनावणी 26 नोव्हेंबरला आहे, अशी माहिती अधिकृत सुत्रांनी दिली. 

 

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT