Candidates worried about the result of mpsc exam results not being timely kolhapur marathi news  
कोल्हापूर

‘एमपीएसी’ परीक्षांचे निकाल नसल्याने परीक्षार्थींत धाकधूक...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे निकाल वेळेत लागत नसल्याने परीक्षार्थींत धाकधूक लागली आहे. ‘ब’ वर्गातील पोलिस उपनिरीक्षक, एएसओ तसेच ‘क’ वर्गातील कर सहायक परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. वय निघून गेल्यानंतर परीक्षांचा निकाल लागून काय उपयोग, अशी प्रतिक्रिया परीक्षार्थींमधून व्यक्त होत आहे.

विद्यार्थी अभ्यासात व्यस्त

पारंपरिक शाखांतून पदवी घेतल्यानंतर नोकरी मिळत नसल्याने अलीकडील पाच-सात वर्षांत तरुण पिढी मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांकडे वळली. शिक्षण संस्थेसारखेच जाळे स्पर्धा परीक्षेचे धडे देणाऱ्या संस्थांचे निर्माण झाले. सोलापूर, बार्शी या भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने कोल्हापुरात वास्तव्यास आहेत. राहण्या-खाण्यासह एका विद्यार्थ्याला महिन्याला किमान तीन हजारांचा खर्च येतो. नोकरीच्या शोधात असलेले विद्यार्थी मोठी स्वप्ने घेऊन शहरात दाखल झाले आहेत. स्टडी रूममध्ये विद्यार्थी अभ्यासात व्यस्त असतात. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेचे आव्हान विद्यार्थ्यासमोर असते. एकेका गुणासाठी विद्यार्थ्यांचा कस लागत असल्याने परीक्षेचा ताण विद्यार्थ्यांवर असतो. स्पर्धा परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे पाच ते सहा लाख विद्यार्थी अर्ज करतात. परीक्षा दिल्यानंतर दोन वर्षे निकालाची विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागते.

पोलिस उपनिरीक्षकपदाची २०१९ मध्ये परीक्षा झाली असून, डिपार्टमेंटल अंतर्गत ‘पीएसआय’ची परीक्षा २०१७ मध्ये झाली. दोन्ही परीक्षांच्या निकालाच्या प्रतीक्षेत परीक्षार्थी आहेत. महापोर्टलतर्फे घेण्यात येणाऱ्या आरोग्यसेवक, ग्रामसेवक परीक्षाही झालेल्या नाहीत. महापोर्टलच्या कारभाराविरोधात नाराजीचा सूर आहे. 

पोलिस भरतीची प्रक्रियाही रेंगाळली

पोलिस भरतीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणे पहिल्यांदा शारीरिक चाचणी व नंतर लेखी परीक्षा घ्यावी, अशीही विद्यार्थ्यांची मागणी आहे. पोलिस भरतीच्या तीन हजार ४०० जागांसाठी १२ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ही प्रक्रियाही सहा महिन्यांपासून रेंगाळली आहे. महापोर्टलच्या तांत्रिक त्रुटी पाहता पोर्टल बंद करून पूवीप्रमाणे परीक्षा लोकसेवा आयोगातर्फे घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Hinjawadi Metro Line 3 Inauguration : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो!

शाळेत घुसून दहावीच्या दोन मुलींवर करवतीने हल्ला; एकीची प्रकृती गंभीर, आरोपी अटकेत

फाइव्ह स्टार हॉटेलच्या स्विमींगपूलमध्ये उतरले, शॉक लागून २ परदेशी नागरिकांचा मृत्यू; वाचवायला गेलेले दोघे जखमी

Marathi News Live Updates : शिवाजीनगर न्यायालयात बेकायदा जमाव जमवून गोंधळ घालणे पडले महागात; पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या ९ जणांविरुद्ध FIR दाखल

Diwali offer FD: गुंतवणूकदारांना दिवाळी गिफ्ट! 'या' बँकेकडून FD वर मिळणार भरघोस व्याज; ज्येष्ठ नागरिकांना तर ७.२० टक्क्यांपर्यंत परतावा

SCROLL FOR NEXT