Candle Light Dinner And A Grass For The Hungry 
कोल्हापूर

कॅंडल लाईट डिनर अन्‌ एक घास भुकेलेल्यांसाठी...! 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : प्रेमोत्सवाचा उत्साह आता टीपेला पोचला असून आज व्हॅलेंटाईन वीकमधील "प्रॉमिस डे' सर्वत्र साजरा झाला. शुक्रवारी (ता.14) सर्वत्र व्हॅलेंटाईन डेची धूम राहणार असून गुरूवारी (ता.13) पासूनच या सेलीब्रेशनला प्रारंभ होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील बहुतांश हॉटेल्समध्ये कॅंडल लाईट डिनर पार्टीचे आयोजन केले आहे. 

प्रॉमिस डेनिमित्त आज दिवसभर सोशल मीडियावर विविध मेसेजीस शेअर झाले. "पहिले प्रॉमिस आईबाबांना..माझ्या जीवनात सगळ्यात पहिले स्थान तुमचे असेल. दुसरे प्रॉमिस सर्व मित्रांना..कितीही नवे मित्र मिळाले तरी जुन्या मित्रांना कधी विसरणार नाही. तिसरे प्रॉमिस सर्वांसाठी...कारण तुमची साथ कधीच सुटणार नाही' अशा आशयाच्या मेसेजीसचा त्यामध्ये समावेश होता. 

एकीकडे व्हॅलेंटाईन डेची धूम सुरू असली तरी काही संस्था व संघटनांनी व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. केवळ हा प्रेमिकांचा उत्सव नसून समाजातील वंचित घटकांवरही यानिमित्ताने प्रेम व्यक्त करूया, असे आवाहन या संघटनांनी केले आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षीपासूनच फेब्रुवारीतील तिसरा रविवारी रोटी डे म्हणून साजरा होवू लागला आहे.

यंदाही या उपक्रमाच्या तयारीला प्रारंभ झाला असून विविध कार्यक्रमातून "एक घास भुकेलेल्यांसाठी' असे आवाहन केले जावू लागले आहे. कोल्हापूर यूथ मुव्हमेंटस्‌च्या वतीने रविवारी (ता.16) बिंदू चौकात सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत हा उपक्रम होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: ‘शिवसेना’ कुणाची? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी शिंदेंचा मोठा दावा; नेत्यांना दिल्या खास सूचना, राजकारणात खळबळ!

Agricultur Admission: कृषी प्रवेशाची पहिली यादी जाहीर! तुमचे नाव आहे का? १०,९७६ विद्यार्थ्यांना मिळाली प्रवेशाची संधी

BEST Bus Strike: मुंबईकरांचे हाल! बेस्ट कर्मचारी पुन्हा आक्रमक, संपावर जाण्यास ठाम

Marathi News Updates : शाहरुख खानच्या घरात दोन साप, ८ फुटी सापाने झोप उडवली

पुण्यातील 'कॅफे फ्लाईंग जिप्सी'मध्ये पहाटे वाजता थरार, रीलस्टार Madhavi Kumbhar सोबत ७ जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT