कोल्हापूर

जिल्ह्यात गांजाचा धूर...  मुलांत फॅशन, पालकांच्या चिंतेत वाढ 

राजेश मोरे

कोल्हापूर  : जिल्ह्यात गांजाचा धूर निघतोय. पोलिसांनी वर्षात तब्बल 111 किलो गांजा जप्त करण्याच्या कारवाईतूनच स्पष्ट झाले आहे. गांजा तस्कर एजंटातर्फे जिल्ह्यात बस्तान बसविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गांजाच्या धुंदीत मुले अडकणार तर नाहीत ना, अशी धास्ती पालकांना वाटू लागली आहे. 
लॉकडाउन काळात राजारामपुरी पोलिसांनी शेंडा पार्क येथे छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 20 किलो गांजा जप्त केला. यानंतर याचे कनेक्‍शन शोधून काढण्यास सुरवात केली. त्यातही दीड किलो गांजा जप्त करत सहा जणांवर कारवाई केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुरगूड परिसरात तिघांना ताब्यात घेऊन दीड किलो गांजासह, भांगेच्या गोळ्या आणि दोन लाख 46 हजारांची रोकड जप्त केली होती. जिल्ह्यातील यावर्षीच्या या मोठ्या कारवाया ठरल्या. दरम्यान, तोरस्कर चौक परिसरात एकाकडून दीड किलो, मोरेवाडीत दोघांकडून अर्धा किलो, कदमवाडीत दोघांकडून 250 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. जिल्ह्यात या वर्षात पोलिसांनी अंमली पदार्थअंतर्गत केलेल्या कारवाईतून 111 किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. त्याचबरोबर नुकतीच वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने पाठलाग करून दोन किलोहून अधिकचा मोटारीत लपवलेला गांजा जुना राजवाडा पोलिसांना पकडण्यात यश मिळाले. 
पोलिसांच्या या कारवाईवरून जिल्ह्यात गांजाचा धूर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतोय, हे उघड होते. सिगारेटमध्ये गांजा घालून त्याचा झुरका ओढण्याची आज फॅशन बनली आहे. यात सतत वेगळ काही करण्यात अग्रेसर असणारी तरुणाई अडकण्याचे धोके वाढू लागल्याने पालकांच्यात चिंता आहे. 

2018 मधील गुन्ह्यांचे स्वरूप 
प्रकार दाखल उघड 
*दारू* 1132 1132 
*अमली पदार्थ* 50 50 

2019 मधील गुन्ह्यांचे स्वरूप 
प्रकार दाखल उघड 
*दारू* 1215* 1214 
*अमली पदार्थ* 32* 32 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT