A case has been registered against the police officer for violating the Sangli district lockdown order  
कोल्हापूर

'ती' कार सांगली हद्दीत घुसली, पोलिसांनी पाठलाग केला तर त्यात दिसले वेगळंच...

सकाळवृत्तसेवा

नेर्ले (सांगली) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी असताना मुंबईहून सांगली जिल्ह्यात जबरदस्तीने प्रवेश करणाऱ्या मुंबई येथील एका पोलीस अधिकाऱ्यावर सांगली जिल्हा बंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल त्याच्या बरोबर असणाऱ्या तिघाच्यावर कासेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक विजय गावडे (सद्या रा. मुंबई डी बी मार्ग पोलीस ठाणे मुंबई) संतोष किसन जाधव (पोलीस नाईक वरळी वाहतूक शाखा मुंबई बांद्रा) हर्षदा संतोष जाधव (सांगली) सोहनी रवी जाधव (सांगली) अशी त्यांची नावे आहेत.याबाबत आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप विष्णू ढेरे यांनी या सर्वांच्या विरोधात कासेगाव पोलिसात फिर्याद दाखल केली.

कासेगाव पोलिसातून मिळालेली माहिती अशी, दि. 28 रोजी  मुंबई वरुन पोलीस उपनिरीक्षक हे मोटर कार ने आपल्या गावी सांगलीकडे येत होते.दरम्यान सांगली जिल्हा हद्दीवरील महामार्गावर पहाटे ५ च्या दरम्यान एक कार वेगाने येताना दिसली यावेळी सांगली जिल्हा कासेगाव पोलिसांनी त्याची गाडी थांबवण्यास इशारा केला. परंतु गाडी तशीच जबरदस्तीने महामार्गावर वेगाने मार्गस्थ केली. कासेगाव पोलिसांनी गाडीचा पाठलाग करीत ही कार नेर्ले येथील महामार्गावर अडवली. यावेळी पोलिसांनी  जिल्ह्यात प्रवेश करण्याबाबत विचारणा केली.परंतु पोलीस अधिकारी असल्याचा  गैरवापर करत कासेगाव पोलिसांशी हुज्जत घातली.बराच उशीर वादावादी झालेनंतर या अधिकाऱ्याला  कासेगाव पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेले.  त्याच्यासह मुंबई ते सांगली येथे प्रवास करून सांगली जिल्हाधिकारी यांच्या जिल्हाबंदी संचारबंदी आदेशाचा भंग करून गावी येण्याचे गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कासेगाव पोलिसांनी या अधिकाऱ्यावर आज गुन्हा दाखल केला. त्यांची रवानगी मुंबईला करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT