Kolhapur Crime News Child Marriage esakal
कोल्हापूर

धक्कादायक! पुरोगामी कोल्हापुरात बालविवाह करून मुलीला केलं गरोदर; नवऱ्यासह पाच जणांवर गुन्हा

राजर्षी शाहूंच्या कोल्हापूर जिल्ह्यात मान खाली घालावी, अशी घटना घडलीय.

सकाळ डिजिटल टीम

राजर्षी शाहूंच्या कोल्हापूर जिल्ह्यात मान खाली घालावी, अशी घटना घडलीय.

कोल्हापूर : देशाच्या कानाकोपऱ्यात आजही बालविवाहाला (Child Marriage) मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जात आहे. बालविवाहावर बंदी असून अनेकांकडून या कायद्याचं उल्लंघन केलं जात आहे. असाच धक्कादायक प्रकार पुरोगामी कोल्हापुरात घडला असून नागरिकांतून रोष व्यक्त होतं आहे.

राजर्षी शाहूंच्या कोल्हापूर जिल्ह्यात मान खाली घालावी, अशा घटना दिवसेंदिवस वाढताना दिसताहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) दऱ्याचे वडगाव (Vadgaon) इथं एक धक्कादायक घटना समोर आलीय. अवघ्या 14 वर्षांच्या मुलीशी लग्न करत गरोदर केल्याची घटना समोर आलीय.

अवघ्या साडेबाराव्या वर्षात झालं लग्न

दरम्यान, तिचं अवघ्या साडेबाराव्या वर्षात लग्न झाल्याचंही उघड झालंय. या घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यात शाहू महाराजांनी घालून दिलेल्या शिकवणींना गालबोट लागत असल्याचं दिसून येत आहे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी वेळी डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी अधिक तपासणी केली. यावरून बालविवाहाचा प्रकार उघड झालाय. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अल्पवयीन मुलीचा नवरा, आई, वडिलांसह पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT