case registered against three people in kolhapur hupari
case registered against three people in kolhapur hupari 
कोल्हापूर

कोल्हापूर ; उपसरपंच, सदस्यांना शिवीगाळ करणे पडले चांगलेच महागात 

सकाळ वृत्तसेवा

पट्टणकोडोली - पट्टणकोडोली (ता.हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह सदस्य व कर्मचार्‍यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी हुपरी पोलिसांत तीन जणांविरोधात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण रामा कोळी, संतोष लक्ष्मण कोळी आणि दिपक लक्ष्मण कोळी अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पट्टणकोडोली येथे लक्ष्मण कोळी याने विनापरवाना बांधकाम करून ग्रामपंचायत मालकीच्या गटारीवर अतिक्रमण केले आहे. याबाबत तेथील शेजारी मेडशिंगे यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार दिली होती. त्यानुसार कोळी यास ग्रामपंचायत कार्यालयात बोलावण्यात आले होते. यावेळी लक्ष्मण कोळी, मुलगा संतोष व दिपक यांना घेऊन ग्रामपंचायतीत आला. तेते चर्चा सुरू असाता उपस्थित असलेल्या चंद्रकांत व सहदेव मेडशिंगे यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न करताच उपसरपंच, सदस्य व कर्मचारी यांना ही अर्वाच्य शिवीगाळ करत हातात फावडे घेवून अंगावर धावत जावून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या सर्वांना जीवे मारण्य‍ाची धमकी देत कार्यालयातील टेबलावरील फाईली व साहित्य विस्कटून टाकले. या प्रकारामुळे ग्रामपंचायतीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर उपसरपंच, सदस्य व कर्मचार्‍यांनी हुपरी पोलीस ठाण्यात धाव घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्य‍ाची मागणी केली. मात्र घटना दुपारी १२ वाजता घडली असताना  रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी कोणतीच कारवाई  केली नाही.

ही बाब ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या निदर्शनास आणू देताच त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रात्रभर शोध घेवून कोळी व त्याच्या मुलांना बुधवारी सकाळी हुपरी येथील एका वकीलाच्या दारातून अटक केली. यावेळी पोलिसांनी त्या तिघांना चांगलाच पोलीसी खाक्या दाखवला. याबाबत ग्रामविकास अधिकारी राहूल सिध्दनाळे यांनी हुपरी पोलीसात फिर्याद दिली आहे.
 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT