Caution ... being on the manhole below the road will damage the vehicles 
कोल्हापूर

सावधान... रस्ता खाली अन्‌ मॅनहोल वर असल्याने वाहनांचे होईल नुकसान

सुयोग घाटगे

कोल्हापूर :  येथील रंकाळा परिसरानजीक असणाऱ्या राजकपूर पुतळा ते शहाजी वसाहत मार्गावर रस्ता खाली आणि मॅनहोल वरती अशी परिस्थिती आहे. रस्त्याच्या मधोमध आणि उंच असणाऱ्या या मॅनहोलमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच या मॅनहोलला धडकल्यामुळे चारचाकी वाहनांचे नुकसानही होत आहे. 
रंकाळा परिसरातील राजकपूर पुतळा ते शहाजी वसाहतकडे जाणारा अरुंद रस्ता आहे. संभाजीनगर, टिंबर मार्केट परिसराला जोडणारा हा रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूने लोकवस्तीही आहे. असे असूनही या रस्त्याच्या मधोमध असणारे चेंबरचे मॅनहोल परिसरातील नागरिकांबरोबरच वाहनधारकांच्याही डोकेदुखीचे कारण ठरले आहेत. निव्वळ अर्धा किलोमीटरच्या अंतरावर 14 मॅनहोल तेही रस्त्याच्या मधोमध आणि रस्त्याच्या सपाटीपासून उंच असल्यामुळे चारचाकी आणि रिक्षा या वाहनांना या रस्त्यावरून वाहन चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर असणारे हे 14 चेंबर हे साधरणतः 60 फूट अंतरावर आहेत. चेंबर हे रस्त्याच्या सपाटीपासून साधारण सहा इंच उंचीवर आहेत. या चेंबरची उंची जास्त असल्यामुळे चारचाकी वाहन, रिक्षा अशा वाहनाच्या तळाला याचा जोरदार आघात होतो. अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावरून ये- जा करीत असताना हे चेंबर चुकवण्याचा प्रयत्नात तोल जाऊन पडण्याची शक्‍यता बळावते. या परिसरातील हा रस्ता मागील दोन वर्षांमध्ये दोन वेळा केला आहे. असे असूनही हे चेंबर अजूनही रस्त्याच्या सपाटीपासून उंचच आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, CSK vs GT: चेन्नईने दिली यष्टीरक्षक फलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी; गुजरातनेही केला संघात बदल

Ayodhya Train Tour: फक्त १६,७०० रुपयांत '६ धाम' यात्रा! IRCTCचा अयोध्येपासून पुरीपर्यंतचा धमाका; पाहा काय आहे खास पॅकेज!

Malaria Risk in Summer: पावसाळ्यातच नाही, उन्हाळ्यातही वाढतोय मलेरियाचा धोका; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Live Update: पिक विम्यावरून शेतकऱ्यांचा संताप! 29 एप्रिलला आमरण उपोषणाचा इशारा

Horoscope : उद्या 27 एप्रिलला बनतोय धनतारिणी योग! 'या' 3 राशीच्या लोकांवरचे मोठे संकट टळणार; नव्या महिन्यात घरी येईल बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT