Caution is not taken at ATMs in Kolhapur 
कोल्हापूर

Video - कोल्हापुरात एटीएममध्ये घेतली जात नाही खबरदारी

सुयोग घाटगे

कोल्हापूर : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून विविध उपाययोजना राबवण्यात येत असताना शहरी आणि ग्रामीण भागातील काही  एटीएममध्ये मात्र खबरदारी घेतली जात नसल्यचे चित्र आहे. उपनगरातील एटीएममध्ये सॅनिटायजेशनची व्यवस्था नसल्यामुळे विषाणूचा फैलाव होण्याची शक्‍यता आहे. तर काही ठिकाणी सॅनिटायझेशन करण्यासाठी विशेष लोकांची पगारी नेमणूक करण्यात आली आहे. 

सोशल डिस्टन्स पाळले जात आहे. हस्तांदोलन टाळणे, बोलताना अथवा भेटताना किमान 3 फुटांचे अंतर ठेवणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर लावणे असे उपाय सर्वजण करत आहेत. सार्वजनिक ठिकाणे तर बंदच केली आहेत, मात्र अशाप्रकारची खबरदारी मात्र शहरासह, उपनगर परिसर आणि ग्रामीण भागातील एटीएम सेंटरवर घेतली जात नसल्याचे चित्र आहे. नुकतेच अनेकांचे पगार झाले असून, अधिकतर पगार हे ऑनलाईन पद्धतीने दिले आहेत. यामुळे अनेकांनी हे पैसे मिळवण्यासाठी बॅंक अथवा एटीएम सेंटरवर धाव घेतली आहे. या एटीएम सेंटरचा वापर विना दिक्कत कोणीही करू शकत असल्यामुळे याठिकाणी प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. एटीएम सेंटरमध्ये मशीनशी होणार संपर्क हा प्रत्यक्ष असतो. शिवाय या ठिकाणी एसीही सुरू असतो, असे हे चित्र धोकादायक आहे. यातच या ठिकाणी सॅनिटायझर नसल्यामुळे हात सॅनिटायझरने स्वच्छ करून या एटीएमची हाताळण्याची सुविधाही नाही, अशी व्यवस्था उपलब्ध होणे गरजेचे आहे.  एटीएम सुरक्षा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन सुद्धा काही ठिकाणी याचे पालन होत नाही आहे. राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम ठिकाणी सॅनिटायझर देण्यासाठी रोजंदारी कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. अशा ठिकाणी नेमणूक असणारे मात्र आपली भूमिका चोख बजावत असून येणाऱ्या प्रत्येकाला सॅनिटायझर देतात. शिवाय थोड्या थोड्या वेळाने मशीनचे सॅनिटायझेशन देखील केले जाते.


एटीएमवर अशी घ्या काळजी
स्वच्छ हाताने एटीएम हाताळा मिनी स्टेटमेंट इतरत्र टाकू नका. 
एटीएम सेंटरच्या डोअर हॅण्डलशी संपर्क टाळा 
हाताला सॅनिटायझर लावूनच पैसे घ्या 
मशीनच्या बटणांना सॅनिटायझर थेट लावू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Marathwada Vidarbha : बंडखोर खासदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे शड्डू ठोकणार; मराठवाडा ते विदर्भ दौरा ठरला

Germany vs Ivory Coast: दोन गोल अपात्र ठरवले, तरी जर्मन्स नाही खचले; भरपाई वेळेत आयव्हरी कोस्टावर रोमहर्षक विजय

Maharashtra Politics: अमित शहांचं भाषण सुरू असताना पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल, एक फोन अन्‌ शिंदे ताडकन उठले

Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

SCROLL FOR NEXT