Caution: If you steal water in Kolhapur, you will go to jail 
कोल्हापूर

खबरदार ः कोल्हापुरात चोरून पाणी घ्याल तर जेलमध्ये जाल

प्रतिनिधी

कोल्हापूर ः महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अनधिकृत नळकनेक्‍शन घेणाऱ्या एकावर आज चक्क फौजदारी दाखल केली. सतिश रतिलाल शहा (3196 ए वॉर्ड, बाबूजमाल मशिद समोर) असे त्यांचे नाव आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने 27 मे रोजी तपासणी केली असता शहा यांच्याकडे अनधिकृत कनेक्‍शन असल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी शहा यांना 25 हजार रुपये दंड केला. तथापि, शहा यांनी कारवाईला दाद दिली नसल्याने आज पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली. 
माहिती अशी, शहरातील पाणीपट्टी वसुली करणे आणि अनधिकृत नळकनेक्‍शनधारकांवर कारवाई करण्यासाठी चारही विभागीय कार्यालयांतर्गत पथके स्थापन केली आहेत. यापैकी, ए वॉर्डमध्ये पाणीपट्ठी अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख संजय पाटील, मीटररीडर बाबासो निकम, मिस्त्री सारंग चव्हाण, फिटर विश्‍वास कांबळे यांची नियुक्ती आहे. पथकाने 27 मे रोजी शहा यांच्या घरी अनधिकृत कनेक्‍शन असल्याचे निदर्शनास आले. दंड करूनही शहा यांनी दाद दिली नसल्याने आज फौजदारी गुन्हा राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

LPG import updates: 'एलपीजी'बाबत सरकारने प्लॅन बदलला! अमेरिकेसोबत मोठा निर्णय, गॅसचं संकट टळणार

Pune Heavy Rain : पावसाने दाणादाण! जनजीवन विस्कळित, घरांसह दुकानांमध्ये शिरले पाणी

Davadi News : रेटवडी येथील तरुण ओढ्यात दुचाकीसह वाहून बेपत्ता

विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाचा निधी संपला! विद्यापीठ शासनाला पाठविणार सुधारित अंदाजपत्रक; पुतळ्याचे तोंड उत्तरेकडे नको, पूर्वकडे करण्याची नवी मागणी

SCROLL FOR NEXT