cctv watch on citizens in kolhapur causes no mask wearing in city travelling 
कोल्हापूर

कोल्हापुरकरांनो सावधान ; मास्क न घालणाऱ्यांवर आहे सीसीटीव्ही वॉच

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून शक्‍य तितक्‍या उपयायोजना केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून मास्क न वापरणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोनाचे संकट वाढू लागले. रुग्णांसाठी बेड मिळणे कठीण बनले आहे.

प्रशासनासह महापालिकेकडून आवश्‍यक त्या उपाय योजना केल्या जात आहे. महापालिका प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगचा भंग आणि मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईसाठी त्यांना पोलिस बंदोबस्तही आहे. तरीही  विना मास्क फिरणाऱ्यांचाही संख्या वाढू लागली आहे. याची दखल घेत प्रशासनाने शहरात सेफ सिटी अंतर्गत लावलेल्या सीसीटीव्ही आधारे संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. 

मास्क न वापरणाऱ्यांची छायाचित्रे काढून संबधित व्यक्तीवर ऑनलाईन दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कारवाईसाठी पोलिस मुख्यालयातील सीसी टीव्ही रूमची मदत घेतली जात आहे. कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांनी आवाहन केले आहे. त्यामुळे आता शहरवासियांवर सीसी टीव्हीची नजर असणार आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT