Center provides Rs 59000 crore for scholarships BJP MLA Sunil Kamble information press conference kolhapur 
कोल्हापूर

केंद्राकडून शिष्यवृत्तीसाठी 59 हजार कोटींची तरतूद: सुनिल कांबळे

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर:  मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने 59 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. मात्र विरोधक केंद्र सरकारवर खोटा आरोप करत आहेत. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनिल कांबळे यांनी केले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी आमदार कांबळे म्हणाले, केंद्र सरकार मागासवर्गीय शिष्यवृत्ती बंद करण्याच्या पवित्र्यात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता. आरक्षण रद्द करण्याच्या हालचालीही सुरू असल्याचा अपप्रचारही विरोधकांकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात केंद्र सरकारने मागासवर्गियांच्या विकासासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 59 हजार कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारने केली.

पूर्वी शिष्यवृत्ती महाविद्यालयांच्या खात्यात जमा व्हायची. महाविद्यालये शैक्षणिक शुल्काची रक्कम काढून घेऊन उर्वरीत रक्कम विद्यार्थ्यांना द्यायचे. मात्र आता केंद्र सरकारने महाविद्यालयांची फी त्यांच्या खात्यात व उर्वरीत रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पैसे मिळू लागले आहेत. मागासवर्गिय समाजातील नागरिकांचे शिक्षण, रोजगार, उद्योग यासाठीही केंद्र सरकारने भरीव आर्थिक तरतूद केली आहे. असे असूनही कॉंग्रेस, राष्ट्रावादी कॉंग्रेसचे नेते समाजात गैरसमज पसरवून जातीय अभिनिवेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

एक गाव, एक पाणवठा, एक स्मशान भूमी 
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यात भाजपकडे सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत. या तालुक्‍यातील सुमारे 100 ते 150 गावांमध्ये भाजप व संघ परिवारातील संस्थांनी एक गाव, एक पाणवठा व एक स्मशानभूमी ही संकल्पना राबवली. येथे खऱ्या अर्थाने सामाजिक समता प्रस्थापीत झाली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस केवळ समतेच्या गप्पा मारतात. शाहू, फुले डॉ.आंबेडकर यांचे नाव राजकारणासाठी घेतात. मात्र त्यांच्या व्यवहारामध्ये विसंगती दिसते. म्हणूनच माढा तालुक्‍यात मात्र अजूनही बऱ्याच गावांमध्ये मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र पाणवठा पहायला मिळतो. असे सुनिल कांबळे यांनी सांगितले. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT