Challenge to complete the course in 3 months education marathi news 
कोल्हापूर

विद्यार्थ्यांसमोर आता ३ महिन्यांत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान

युवराज पाटील

शिरोली पुलाची (कोल्हापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा दोन महिन्यांपूर्वी सुरू झाल्या आणि लगेच दहावी व बारावी परीक्षेच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. मात्र, दहा महिन्यांचा अभ्यासक्रम तीन महिन्यांत कसा पूर्ण करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांना पडला आहे. 

कोरोनामुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अनेक शाळा व महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले होते. परंतु, त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना म्हणावा तसा फायदा झालाच नाही. २३ नोव्हेंबरपासून शाळांचे काही वर्ग सुरू झाले. शासनाच्या धोरणामुळे २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे; मात्र त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार नाही, असे चित्र आहे.

दरवर्षी अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी दहा महिन्यांचा कालावधी असतो. यावर्षी अध्ययन व अध्यापन प्रक्रिया खंडित झाल्याने विद्यार्थी - शिक्षक प्रत्यक्ष संवाद थांबला होता. नोव्हेंबरअखेर काही वर्ग सुरूही झाले. आता तीन महिन्यांवर परीक्षा आल्या असून, अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान असेल.

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले. तरीही विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून अभ्यास करावा व परीक्षेला सामोरे जावे.
- आर. एस. पाटील, अध्यक्ष, सूर्योदय शिक्षण प्रसारक मंडळ, शिरोली पुलाची

कोरोना काळात सरकारच्या धोरणानुसार ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न शाळांनी केला; मात्र ग्रामीण भागात मोबाईल रेंजच्या कमतरतेमुळे अडचणी आल्या. आता प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या. परंतु, कोरोनाची भीती आहेच. अशा परिस्थितीत परीक्षेची तयारी करताना शिक्षक व विद्यार्थ्यांची धांदल उडणार आहे.
- एस. डी. लाड, अध्यक्ष, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT