chambers of commerce decision of corona start fhops from 9 april in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर : अन्यथा 9 एप्रिलपासून व्यवहार सुरू करू; चेंबर ऑफ कॉमर्सचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यभरातील व्यापारी संघांच्या प्रमुखांनी ‘विकेंड लॉकडाऊन’च्या नावाखाली पूर्ण लॉकडाउन करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचा तीव्र शब्दात निषेध करून कोणत्याही स्थितीत व्यापारी यात सहभागी होणार नसून राज्य शासनाने ८ एप्रिलपर्यंत आदेशात दुरुस्ती करावी, अन्यथा ९ एप्रिलपासून कोरोनाचे नियम पाळत सर्व व्यवहार सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ऑनलाईन बैठकीत दिला. व्यापार सुरळीत सुरू करण्यास सहकार्य करावे, अशी मागणीही केली.

लॉकडाउनच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांत संतापाची भावना निर्माण झाली आहे. याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी व्यापार उद्योग जगताची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या प्रमुखांची ऑनलाईन बैठक आयोजित केली होती. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र चेंबरच्या ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख राजेंद्र बाठीया, ‘केमिस्ट’चे चेअरमन मोहन गुरनानी, यांच्यासह कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, मराठवाडा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, धुळे, सोलापूर, परभणी आदी जिल्ह्यातील व्यापारी संघाचे प्रमुख या बैठकीत सहभागी झाले होते.

उपस्थितांच्या सूचनांचा विचार करून, यासंबंधी शासनाला दोन दिवसांचा वेळ देण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाला यासंदर्भातल्या ठरावाची प्रत पाठवून आठ तारखेला सायंकाळी सहापर्यंत सरकारकडून अपेक्षित निर्णय न झाल्यास, ९ एप्रिल पासून राज्यभरातील सर्व व्यापारी कोरोना प्रतिबंधाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून व्यवसाय सुरू करतील, असा इशाराही सरकारला दिला. राज्यभरातल्या व्यापारी संघाने महाराष्ट्र चेंबर वर दिलेली ही जबाबदारी चेंबर पार पडेल, अशी ग्वाही सर्वांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT