कोल्हापूर

चंदगडला दोन महिन्यांत दुसऱ्यांदा पंचनामे

सुनील कोंडुसकर

चंदगड : तालुक्‍यात ऑगस्टनंतर दुसऱ्यांदा पीक नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात अतिवृष्टी, पूर आणि वादळाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यापाठोपाठ ऑक्‍टोबर महिन्यातही अशीच स्थिती निर्माण झाल्याने केवळ दोन महिन्यांत पुन्हा एकदा पंचनामे करण्यात येत आहेत. 26 तारखेपर्यंत सर्व 157 गावांतील पंचनामे पूर्ण करून तहसीलदारांकडे एकत्रित अहवाल सादर करण्यात येणार आहे. 

ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी आणि जोरदार वादळामुळे ऊस पिकाला मोठा फटका बसला. त्यावेळी झालेल्या नुकसानीचे पंचनामे नुकतेच पूर्ण झाले. तालुक्‍यात सुमारे 1 हजार 704 हेक्‍टरवरील ऊस, भात, नाचणा आदी पिकांना याचा फटका बसला. दरम्यान, या महिन्यातही अशीच स्थिती निर्माण झाली. परतीच्या पावसाने कापणीला आलेले भात पीक जमिनीवर पडले.

अजूनही दररोज पाऊस सुरूच आहे. बहुतांश ठिकाणी पीक उभे दिसत असले तरी शेतात पाणी साचल्याने कापणी, मळणी रखडली आहे. दलदलीत उभे राहून कापणी करताना कामाचा उरक होत नाही. श्रम वाढतात. मजुरी वाढते. उचलापाचलीमुळे दाण्यांची नासाडी होते. मळणीसाठी जागा नसल्यामुळे रस्त्यांचा आधार घ्यावा लागत आहे. पावसाची वेळ सांगता येत नसल्याने अनेकदा कापणी केलेले पीक आणि मळण्या पावसात सापडत आहेत. हा सुद्धा शेतकऱ्यांच्या नुकसानीचाच एक भाग आहे. शासनाने तो गृहीत धरून शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे. 

दरम्यान, तहसीलदारांनी आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांचे पथक तयार करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. गतवेळच्या नुकसानीत समाविष्ट झालेले क्षेत्र दुबार नुकसानीत येऊ नये याची दक्षता घेऊन पीक पाहणी व पंचनामे करण्यात येत आहेत. 

26 तारखेपर्यंतअहवाल
तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व 157 गावांत पंचनामे केले जात आहेत. 26 तारखेपर्यंत नुकसानीचा एकत्रित अहवाल सादर केला जाईल. 
- किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी. 

दृष्टिक्षेप 
- चंदगड तालुक्‍याचे भौगोलिक क्षेत्र - 95 हजार 221 हेक्‍टर. 
- जंगल क्षेत्र - 28 हजार 136 हेक्‍टर. 
- पिकाखालील क्षेत्र - 54 हजार 707 हेक्‍टर. 
- लागवडीयोग्य पड क्षेत्र - 1 हजार 245 हेक्‍टर. 
- कायम चराऊ क्षेत्र - 1 हजार 850 हेक्‍टर. 
- खरिपाचे क्षेत्र - 33 हजार 910 हेक्‍टर. 
- रब्बीचे क्षेत्र - 930 हेक्‍टर.

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

King Cobra in Sindhudurg : कोकणात 'शक्तिपीठ'च्या प्रस्तावित मार्गावर आढळला 7 फुटी 'किंग कोब्रा'; तळकटच्या जंगलात पिलांचाही वावर असण्याची शक्यता

Mumbai : ४८ वर्षांपूर्वी ५० हजारात ठरलेला व्यवहार, वाद कोर्टात पोहोचला; महिलेला मिळाला घराचा ताबा, २५ लाख रुपये द्यावे लागणार

Pune Sex Racket Bust : पुण्यात चाललंय काय? नामांकित कॉलेजवळच सुरू होते सेक्स रॅकेट, ४ तरुणींची सुटका, ३ जणांना अटक

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला सुरुवात

29 वर्षाचे रजनीकांत 16 वर्षांच्या अभिनेत्रीशी करणार होते लग्न; ‘त्या’ एका अपशकुनामुळे तुटली स्वप्नांची दोरी!

SCROLL FOR NEXT