In Chandgad Taluka Forest Ponds Will Be Maintained Kolhapur Marathi News
In Chandgad Taluka Forest Ponds Will Be Maintained Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

चंदगडच्या जंगलातील पाणवठ्यांची होणार देखभाल

सुनील कोंडुसकर

चंदगड : हिवाळ्यानंतर उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या की झाडांची पानगळ सुरू होते. तळपत्या सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे स्त्रोत आक्रसतात. उघड्यावर साठलेले ओहोळाचे पाणी आटू लागते. तहानेने व्याकूळ झालेल्या जंगलातील पशू-पक्षांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. येथील परीक्षेत्र वन अधिकारी डी. जी. राक्षे यांच्या संवेदनशील मनाने ही बाब हेरली. वन कर्मचारी आणि मजुरांच्या सहकार्याने त्यांनी जंगलातील पाणी साठे स्वच्छ करण्याबरोबर वाहणाऱ्या पाण्याची साठवणूक केली आहे. आता पावसाळ्यापर्यंत या पाणवठ्यांची देखभाल करण्यात येणार आहे. 

तालुक्‍यात चंदगड आणि पाटणे असे वन विभागाचे दोन विभाग पडतात. चंदगड परीक्षेत्रामध्ये कोकण सीमेवरील अतिपावसाचा भाग येतो. हे क्षेत्र जंगलाने व्यापलेले असले तरी खडकाळ भाग असल्याने उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे वन्य प्राण्यांना ताम्रपर्णीच्या पात्राचा आधार घ्यावा लागतो.

सायंकाळी पाणवठ्यावर येण्याच्या वेळी त्यांची शिकार होण्याचा धोका असतो. त्यामुळे जंगलातील पाण्याचे स्त्रोत जीवंत राहिल्यास वन्य प्राण्यांना सुरक्षितता लाभेल या हेतूने राक्षे यांनी पाणवठे दुरुस्ती आणि स्वच्छतेची मोहिम आखली. वन कर्मचारी आणि वन मजुरांच्या मदतीने त्यांनी दोन दिवस कष्ट घेऊन हे काम पूर्ण केले. जंगलात ओहोळाच्या पात्रात जागोजागी साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात झाडांची पाने पडली होती.

ती कुजल्यामुळे प्राण्यांना पाणी पिणे अशक्‍य होते. अशा ठिकाणी पाण्यातीन पाने बाजूला काढण्यात आली. काही ठिकाणी जमिनीतून उगम पावलेले पाणी जमिनीला समतोल वाहत होते. ते पीता येत नसल्याने त्याच्या चारही बाजूंनी दगडमातीचा भराव घालून ते अडवण्यात आले. त्यामुळे साचलेले पाणी पिण्यास सुलभ झाले आहे. पुढे पावसाळा सुरू होईपर्यंत या पाणवठ्यांची देखभाल केली जाणार असल्याचे राक्षे यांनी सांगितले. 

शिकार रोखण्याच्या हेतूने स्वच्छता
पाणी म्हणजे जीवन आहे. जंगली पशू, पक्षी आपली हद्द सोडून जंगलातून बाहेर येताना अत्यंत संवेदनशील असतात. पाण्यासाठी वनातून बाहेर आल्यास त्यांच्या जिविताला धोका असतो. शिकार होते. ते रोखण्याच्या हेतूने पाणवठ्यांची स्वच्छता केली आहे. 
- डी. जी. राक्षे, वनक्षेत्रपाल, चंदगड 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT