Chandoli Reservoirs and sanctuaries tourism closed for three days 
कोल्हापूर

चांदोली अभयारण्य पर्यटन तीन दिवस राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा

भेडसगाव (कोल्हापूर) :  1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेले चांदोली जलाशय व अभयारण्य 31 डिसेंबर व नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर 30 डिसेंबर ते 1 जानेवारी 2021 पर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याचे चांदोली वन्यजीव विभाग व धरण प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

  पावसाळ्यानंतर 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेले चांदोली धरण व अभयारण्य पाहण्यासाठी चांदोलीकडे दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला 20 दिवस अभयारण्य पर्यटकांसाठी मोफत खुले करण्यात आले होते, यावेळी कोरोनाच्या महामारीने आठ महिने अडकून पडलेल्या हजारो पर्यटकांनी कुटुंबासह भेट देऊन तेथील प्राणी, पक्षी, थंडगार हवा, निसर्ग सौंदर्य, जलाशय याचा मनमुराद आनंद लुटला होता. 
हेही वाचा- कोल्हापूरच्या विकासातील महत्त्वाचे केंद्र  -


उत्साही पर्यटकांच्या वाढत्या संख्येने राष्ट्रीय उद्यानमधील वन्यजीव तसेच धरण परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच 31 डिसेंबर व नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव 30, 31 डिसेंबर व 1 जानेवारी 2021 रोजी असे तीन दिवस चांदोली पर्यटन बंद राहणार आहे. शनिवार (ता. 2)पासून अभयारण्य व धरण पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे, असे आवाहन चांदोली वन्यजीव विभाग तसेच धरण प्रशासन मार्फत करण्यात आले आहे.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT