कोल्हापूर

अजित पवारांना ना तत्व, ना व्यवहार; चंद्रकांत पाटीलांची टीका

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचा कर कमी केला पाहिजे

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : झोपेत सत्ता कशी येते हे अजित पवारांना माहिती आहे. भाजपसोबत एका रात्रीत आलेली सत्ता त्यांनी अनुभवली आहे. अजित पवारांना ना कोणते तत्त्व, ना कोणता व्यवहार आहे. सत्ता कोणाचीही येवो त्यांचे उपमुख्यमंत्रीपद नक्की आहे. त्यामुळे अजित पवारांनी तोंड सांभाळून बोलावे. असा दम भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यामांत्री अजित पवार यांना दिला. केंद्रातील भाजप सत्तेला सात वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने पक्षाच्यावतीने विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सत्ता बदलाचे भाकीत करताना चंद्रकांत पाटील जागे होते का. अशी टीका अजित पवारांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'झोपेत असताना सत्ता कशी आणायची हे अजित पवारांना चांगले माहिती आहे. एका रात्रीत आलेली सत्ता त्यांनी तीन दिवस अनुभवली आहे. त्यांच्यासोबत आलेल्या आमदार परत पवारांकडे पळून गेले. त्यामुळे भाजपबरोबर त्यांनी केलेले सरकार पडले. अजित पवारांना कोणतेही तत्त्व किंवा व्यवहारात नाही.

भाजप बरोबरी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आता शिवसेनेबरोबरही ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना कोणते तत्त्व ना कोणता व्यवहार आहे. पण पवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आम्ही फाटके आहोत. आम्ही बोललो तर त्यांची पंचाईत होईल. त्यामुळे त्यांनी तोंड सांभाळून बोलावे. असा सज्जड दम चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना दिला. खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील म्हणाले, 'कोविद संपल्यावर मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करू अशी संभाजी राजे यांची भूमिका आहे. ती आम्हाला मान्य नाही. कोबीड आणि मराठा आरक्षण यांचा काही संबंध नाही.'

पेट्रोलवर असलेला राज्याचा कर कमी करा

पेट्रोल वर राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही कर असतात. राज्य सरकारने आपले कर कमी केले तर पेट्रोलच्या किमती कमी होतील. अन्य राज्यात महाराष्ट्राच्या तुलनेत पेट्रोलच्या किमती कमी आहेत. असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT