Chandrakant Patil Google
कोल्हापूर

OBC आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय निवडणूक होऊ देणार नाही

सकाळ डिजिटल टीम

सांगली : ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याची राज्य सरकारची मानसिकता नाही. ठरवले तर काही दिवसांत हा विषय संपवता येईल, मात्र महाविकास आघाडीला ते करायचे नाही. आम्ही ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय राज्यात एकही निवडणूक होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

‘भाजप आता गप्प बसणार नाही. अनिल परब काय बोलले हे घराघरांत पोहोचले.

ते म्हणाले, ‘‘या सरकारला आरक्षणाचा कायदा कळत नाही, त्यांना फक्त पैसा कळतो. जिल्हानिहाय ओबीसींची संख्या ठरवून त्या प्रमाणात आरक्षण निश्‍चित करायचे आहे, त्यात फार मोठे काही नाही. पण, इच्छाशक्ती नाही. त्यांचे सल्लागार चुकीचे आहेत. मराठा समाजाला मागास ठरवण्यात किती वेळ घालवणार आहात? ही राज्याची जबाबदारी आहे. कशाची तयारी नाही आणि हे निवडणुकीसाठी प्रभागांची रचना करायला निघाले आहेत. तुम्ही तयारी कराच, लोक तुमची वाट लावायला वाट पहात बसले आहेत. तीन पक्ष दिवसभर भांडतात आणि सरकार पडायचा मुद्दा आला की तिघे एकमेकांचा घट्ट मिठी मारून बसतात. गुंड आणि पोलिसांच्या बळावर हे सरकार चालवले जात आहे.’’

ते म्हणाले, ‘‘भाजप आता गप्प बसणार नाही. अनिल परब काय बोलले हे घराघरांत पोहोचले आहे. केंद्र सरकारने त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणात लवकरच याचिका दाखल होईल. नारायण राणे यांच्याविषयीचे त्यांचे विधान धक्कादायक होते आणि ते मंत्री असल्याने सो-मोटो कारवाई करता येईल का, हेही तपासून पाहतो आहोत. वकिलांची फौज त्यावर काम करते आहे. आता ते घाबरले आहेत.’’

ते म्हणाले, ‘‘नारायण राणे यांच्या प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले होते, हा मुद्दा बाजूला पडला होता. खरे तर तो चर्चेत यायला हवा. मुख्यमंत्र्यांना देशाच्या स्वातंत्र्याचा हीरकमहोत्सव की अमृतमहोत्सव माहीत नसावे, हे गंभीर नाही का? त्यामुळे राज्यभरातून ७५ हजार पत्रे पाठवून मुख्यमंत्र्यांना त्याची जाणीव आम्ही करून देणार आहोत.’’

तुमच्या वृत्तपत्राचा रिसर्च करा

भाजप-शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकच आहेत, पण भाजपमध्ये बाहेरून आलेले लोक शिवसेनेवर नाहक बोलतात, असे विधान करणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी भाजपमध्ये भांडणे लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते म्हणाले, ‘‘एकविचाराचे सोडा हो. गेल्या पाच वर्षांतील ते संपादक असलेल्या वृत्तपत्राचे अंक काढा. दररोज भाजपला, मोदी-शहांना शिव्या, योगींना शिव्या दिल्या जात होत्या. त्याचा रिसर्च तुम्ही करा, मी केला तर तुम्हाला परवडणार नाही.’’

नारायण राणे हे शिवसेनेच्या धाटणीचे नेते आहेत. तिकडेच तयार झालेत. मारेन, तोडेन, फोडणे ही तिकडचीच भाषा आहे. ते त्यांच्या स्टाईलने बोलतात. तुम्ही बोलणार आणि ते कसे गप्प बसतील. आम्हीही तेच बोलतो, फक्त नीट बोलतो.

- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्षस भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddaramaiah Latest News : सिद्धरामय्या घेताय राजकारणातून निवृत्ती? ; मुलाच्या विधानाने कर्नाटकातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Uganda Accident: भयंकर! ओव्हरटेक करण्याचा बस चालकाचा प्रयत्न अन्...; भीषण अपघातात ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक गंभीर

Navi Mumbai News: दिवाळीनिमित्त पोलीस सतर्क! सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

Mumbai News: लाखोंच्या शासकीय निधीची अफरातफर, माजी आमदारांविरोधात भाजप आक्रमक; चौकशीची मागणी

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी

SCROLL FOR NEXT