chandrakant patil criticism on maharashtra government 
कोल्हापूर

राज्यात हुकूमशाहीचा कारभार ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - केंद्राचा कायदा राज्यात लागू करायचा नसेल तर पर्यायी कायदा राज्यात करावा लागतो. मात्र असा कोणताही कायदा न करता केवळ एका आमदाराच्या पत्रावर सरकारने नवा कृषी कायदा राज्यात लागू केला नाही. राज्यातील कारभार हा हुकूमशाही पद्धतीने सुरू असल्याचे यावरून दिसते. असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

नवा कृषी कायदा राज्यात अद्याप लागू नाही याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, "ज्यावेळी केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर केलेला कायदा राज्यात लागू करायचा नसेल त्यावेळी त्याला पर्यायी कायदा करावा लागतो. या पर्यायी कायद्यावर राज्यपाल, राष्ट्रपती यांची स्वाक्षरी व्हावी लागते. मात्र असे काहीही न करता केवळ आमदार शशिकांत शिंदे यांच्या एका पत्रावर केंद्राचा कायदा महाराष्ट्रात लागू नसल्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. राज्यात सध्या हुकूमशाहीचे राज्य असल्याचे या वरून दिसते.' केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT