chandrakant patil criticism on uddhav thackeray 
कोल्हापूर

दसऱ्याचे नव्हे शिमग्याचे भाषण ; चंद्रकांत पाटीलांकडून मुख्यमंत्र्यांची खिल्ली

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात महाराष्ट्रातील एकही प्रश्‍न नव्हता. केवळ विरोधकांना शिव्या, शाप देणारे ते भाषण होते. राज्यपालासारख्या घटनाधिष्टीत पदाचाही सन्मान ठाकरे यांनी भाषणात ठेवला नाही. विरोधकांना शिव्या देणारेच त्यांचे भाषण हे दसऱ्याचे नव्हते तर शिमग्याचे होते. असा टोला आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. 

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, "शिमग्याला आपण जे करतो ते मुख्यंत्र्यांनी दसऱ्याच्या भाषणात केले. त्यांचे भाषण म्हणजे केवळ विरोधकांना शिव्या शाप होते. शेण, गोमूत्र असेच शब्द त्यांच्या भाषणात होते. शेतकरी कर्जमाफी, चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, अवकाळी पावसाने झालेले नुकसान, मराठा आरणक्षण, शैक्षणिक वर्षाची सुरुवात यातील एकाही प्रश्‍नावर ते बोलले नाहीत. त्यांच्याजवळ अकरा महिन्यांच्या कारकिर्दीत सांगण्यासारखे काहीही नाही. राज्यपालांचाही सन्मान त्यांना ठेवता आला नाही. त्यांच्या भाषणाने मुख्यमंत्री पदाची गरीमा खालावली. ते भाषण दसऱ्याचे नव्हते तर शिमग्याचे होते. आमच्यावर टीका केल्यावर जशाच तसे उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. त्यामूळेच आम्ही त्यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले.' 

त्यांच्या हिंदुत्वाचा बुरखा फाटला 
भाजपेने हिंदुत्व म्हणजे काय हे शिकावे या प्रश्‍नावर पाटील म्हणाले, "खरे हिंदुत्ववादी कोण आहे हे राज्यातील जनतेला माहिती आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाचा बुरखा फाटला आहे. लोकांना केवळ निवडणुकीतच आपले मत व्यक्त करता येते. त्यामुळे निवडणुकीमध्ये खरे हिंदुत्त्ववादी कोण हे मतदार शिवसेनेला दाखवून देतील.' 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT