कोल्हापूर

OBC Reservation: पवारांची पोलखोल करणार - चंद्रकांत पाटील

सकाळ डिजिटल टीम

मराठा समाजाला मागास ठरविण्यासाठी सहा आयोग नेमले; मात्र एकाही आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवले नाही. त्यावेळी पवार काय करत होते?

कोल्हापूर : आरक्षणावरून ज्येष्ठ नेते शरद पवार की केंद्र सरकार (central government) जनतेची दिशाभूल करत आहे, हे मराठा व ओबीसीतील सर्वसामान्य घटकाला माहीत आहे. ५८ वर्षे सत्तेत असताना शरद पवार (sharad pawar) यांना मराठा समाजाला मागास का ठरवता आले नाही? ते ओबीसीसंदर्भात (OBC reservation) गावोगाव सभा घेणार असतील, तर त्यांची पोलखोल करणाऱ्या सभा त्या त्या गावात दुसऱ्याच दिवशी घेतल्या जातील, अशी माहिती भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (chandrakant patil) पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, ‘‘मराठा समाजाला मागास ठरविण्यासाठी सहा आयोग नेमले; मात्र एकाही आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवले नाही. त्यावेळी पवार काय करत होते? आरक्षणासंदर्भात केंद्राने ५० टक्क्यांहून अधिक वर जायला हवे, हा विषय पवार यांना आज का आठवला? सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळला आहे. त्यामुळे पुन्हा मराठा समाजाला मागास ठरविण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलायला हवीत. हे सरकार सर्वसामान्य मराठा समाजाची फसवणूक करत आहे, हे मी अठ्ठावीस वेळा सांगत आलो आहे.’’

ते म्हणाले, ‘‘पंजाबराव देशमुख यांनी मराठवाड्यात मराठा समाजाला कुणबी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याच वेळी पश्चिम महाराष्ट्रातील नेते आपण देणारे आहोत घेणारे नाही, असे म्हणत राहिले. आता हेच नेते पुन्हा समाजाची दिशाभूल करत आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला मागास ठरविण्याखेरीज पर्याय नाही.’’केंद्रात महाराष्ट्रातील चार मंत्र्यांची नुकतीच वर्णी लागली आहे. त्यांची खाती समजून घेण्यासाठी दिल्ली दौरा केल्याचे त्यांनी सांगितले.

राउंड टेबल चर्चा होऊ दे

राज्यातील पाच पक्षांचे प्रमुख मंत्रालयात बोलावू. यात ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेप्रमुख राज ठाकरे, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना घेऊन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर राउंड टेबल चर्चा होऊ दे. त्या वेळी दूध का दूध व पानी का पानी होईल. त्यातून कोण आरक्षणासंदर्भात खोटे बोलते, हे जनतेला कळेल, असेही प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशी IN... पण, ना संजू OUT, ना अभिषेक..! भारताच्या Playing XI मध्ये दोन खेळाडूंचे पदार्पण होणार

Mobile Restart : मोबाईल कधी रिस्टार्ट करावा अन् कधी नाही? आत्ताच घ्या जाणून नाहीतर फोन होऊ शकतो खराब

एकाच दिवशी ३ दिग्गज क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली; रिटायरमेंट सामन्यात अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ

Thane Crime: क्लासला जातो सांगून ५ जण घराबाहेर पडले, लखनौला पोहोचल्याचे समजल्या नंतर...; मुंब्य्रात नेमकं काय घडलं?

Pune Accident: राजगड सहलीवर काळाचा घाला! पाबे घाटात ट्रॅव्हल बस ४० फूट दरीत; दोन ठार, 19 जण जखमी..

SCROLL FOR NEXT