Chandrakant patil Sakal
कोल्हापूर

Chandrakant Patil: लाभार्थ्यांना 7 दिवसांच्या आत व्याज परतावा द्या, मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध

CD

मुंबई, ता. १८ ः अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडून लाभार्थ्यांना सात दिवसांच्या आत व्याजाचा परतावा द्या. त्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिले.

त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या येथील कार्यालयाला भेट दिली. या वेळी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा केली. महामंडळाकडून आतापर्यंत २३ हजार लाभार्थ्यांना २५ कोटी रुपये व्याज परतावा दिल्याची माहिती त्यांना देण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज सहा हजार लाभार्थ्यांना ४.६५ कोटी रुपयांचा व्याज परतावा ऑनलाईन स्वरुपात वितरित करण्यात आला.

या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘महामंडळातर्फे विविध योजनांना सर्वोत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्या माध्यमातून राज्यभरात जवळपास ७० हजारांहून अधिक मराठा उद्योजक तयार झाले आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीस चालना मिळत आहे. या योजनेसाठी राज्य शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.’’ या वेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते आणि अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता CJP ची नवी लढाई; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, नेमका काय प्लॅन? सरकारचं टेन्शन वाढणार?

भारतीय संघाच्या फिटनेसवर BCCI चा 'सर्जिकल स्ट्राईक'! सीनियर-ज्युनियर पाहू नका, सर्वांना एकच नियम... वाचा BCCI Fitness Standards

मी मराठी नाही, माझं आडनाव राघवन नाही... सुमीत राघवनने पहिल्यांदाच सांगितलं त्याचं खरं नाव; म्हणाला- आम्ही...

SIR Voter List : 'अब्सेंट', 'शिफ्टेड' की 'डुप्लिकेट'? मतदार यादीतील नावांबाबत नवा मेसेज आलाय? घाबरू नका, ही आहे प्रक्रिया

Marathi News Live Updates : जातपडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करते, त्यात सरकारचा हस्तक्षेप नाही; जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

SCROLL FOR NEXT