chandrakant patil said to election of gram panchayat to his activist meeting in kolhapur 
कोल्हापूर

'ग्रामीण भागात पक्षविस्तार करण्यासाठी निवडणूक म्हणजे नामी संधी'

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पक्षविस्तार करणे आवश्‍यक आहे. अधिकाधिक ग्रामपंचायती जिंकल्या पाहिजेत, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरले पाहिजे, यासाठी नियोजन करावे. याकरिता वेगाने तयारीला लागा, अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. आज हॉटेल वृषालीमध्ये त्यांनी ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीतून भाजपच्या मिशन ग्रामपंचायतला प्रारंभ झाला. 

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारीत होणार आहेत. यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने यंत्रणा सक्रिय केली.  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या वेळी पाटील म्हणाले, ‘‘लोकशाही यंत्रणेतील सर्वांत शेवटचा व महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रामपंचायत आहे. ग्रामीण भागात पक्षविस्तार करण्यासाठी ही निवडणूक नामी संधी आहे.

अधिकाधिक कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली गेली पाहिजे, यासाठी सूक्ष्म नियोजन केले पाहिजे. बैठकीला माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, हिंदूराव शेळके, जिल्हा परिषदेतील गटनेते अरुण इंगवले, विजय भोजे, प्रकाश चव्हाण, राहुल देसाई, तानाजी पाटील, अजिंक्‍य इंगवले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

जबाबदारी सोपविलेले नेते
 

 - शिरोळ, इचलकरंजी                         सुरेश हाळवणकर
 - हातकणंगले, करवीर, गगनबावडा       अमल महाडिक
 - राधानगरी, भुदरगड, चंदगड              धनंजय महाडिक
 - कागल, गडहिंग्लज, आजरा                समरजितसिंह घाटगे

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT