Change in Darshan time at Karveer resident Shri Ambabai temple available at the same time marathi news 
कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दर्शन वेळेत बदल; याच वेळेत मिळेल दर्शन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यात वाढत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या पाहता करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. गुरुवार (ता. २५) पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

देवस्थान समिती च्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार अंबाबाई मंदिर सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते रात्री ८ या कालावधीमध्ये दर्शनाकरीता खूले ठेवणेत येणार आहे. दुपारी १२.०० ते दुपारी ३.०० या वेळेमध्ये मंदिर पूर्णपणे बंद राहील.

दरम्यान, मंदिराकडे भाविकांतर्फे करण्यात येणारे धार्मिक विधी, अभिषेक बंद करणेत आले आहेत. भाविकांसाठी करण्यात आलेली ई-पासची सुविधा देखील बंद करण्यात आली आहे. मंदिराच्या पुर्व व पश्चिम दरवाजातून दर्शन सुरु राहणार असुन पूर्व दरवाजाकडील मंडपामध्ये तसेच मुख दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांना देखील रांगेमध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठी आवश्यक मार्किंग करणेत येणार आहे. त्यानुसार भाविकांनी सामाजिक अंतराचे पालन करुन दर्शन घ्यायचे आहे.

मंदिरामध्ये येताना मास्क, सॅनिटायझर तसेच भाविकांचे तापमान तपासणी सुरु आहे. भाविकांनी दर्शनसाठी मंदिरात येताना मास्क वापरणे बंधनकारक असून मंदिरामध्ये विना मास्क आढळल्यास दोनशे रुपये दंडात्मक कार्यवाही करणेत येणार आहे.
या बैठकीस देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, समितीचे सर्व सदस्य, सचिव विजय पावार, जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक प्रमोद जाधव, पूजारी प्रतिनिधी माधव मुनिश्वर उपस्थित होते.


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT