Chavan as Deputy Superintendent of City Police 
कोल्हापूर

पेच अखेर सुटला ; नाशिक मालेगाव कॅंप येथील उप-अधीक्षक मंगेश चव्हाण यांची शहर पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहर पोलिस उपअधीक्षक पदाचा पेच अखेर सुटला. नाशिक मालेगाव कॅंप येथील उप-अधीक्षक मंगेश शांताराम चव्हाण यांची या पदावर नियुक्ती झाली. तत्पूर्वी पदाची सूत्रे घेण्यापूर्वीच बाबूराव महामुनी यांची बदली इचलकरंजी पोलिस उप-अधीक्षकपदी बदली झाली. याबाबतचे आदेश बुधवारी रात्री गृह विभागाकडून प्राप्त झाले.


शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांची नागपूरला बदली झाली. अवैध धंद्यांवर कारवाई करणाऱ्या कट्टे यांची गैरसोईच्या ठिकाणी झालेल्या बदलीबाबत जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. याबाबत विविध संघटनांनी निवेदने देऊन बदली रद्द व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर कट्टे यांची पिंपरी चिंचवड येथे बदली झाली. यानंतर हे पद काही दिवस रिक्त होते. या पदावर तत्कालीन गृह-पोलिस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांची निवड झाली; पण त्यांनी सूत्रे घेतली नव्हती. त्यांनी इचलकरंजीला बदली मिळावी, असे प्रयत्नही सुरू केल्याची चर्चा सुरू होती.

दरम्यान त्यांची इचलकरंजीला बदली झाली. दरम्यान शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांची नियुक्ती झाल्याचे आदेश गृहविभागाकडून प्राप्त झाले. राज्यातील एकूण ३५ उपअधीक्षकांच्या बदल्या बुधवारी रात्री करण्यात आल्या. 
दरम्यान, कार्यकाल पूर्ण झालेल्या कोल्हापुरातील बिनतारी संदेश विभागातील रियाज शेख यांची सांगली येथे बदली झाली. याबाबतचे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयामार्फत प्राप्त झाले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

मशीद शेख यांची महाराष्ट्र केसरीत दमदार कामगिरी; सुवर्णपदकासह बुलेट आणि रोख पारितोषिकावर नाव कोरले

मोखाड्यात "घर घर संविधान" उपक्रमांतर्गत भीमगीतांची जल्लोषात मैफिल; लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीवर नाराजी

LPG Crisis: ऊर्जा संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG पुरवठ्यात 20% वाढ; वाटप 50% पर्यंत वाढवले, राज्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरु

SCROLL FOR NEXT